Breaking

Saturday, 1 January 2022

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार - एस.पी.ला काय फोन करता, आय.जी.ला करा....कासेगाव यात्रेत वाहतूकीची कोंडी पोलिसांकडून नागरिकांना उद्धट वर्तन.


*एस. पी. ला काय फोन करता आय. जी. ला करा*

*कासेगाव याञेत वाहतूकीची कोंडी पोलीसांकडून नागरिकांना उद्घट वर्तन*
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील यल्लमा देवीची यात्रा प्रशासनाकडून रद्द करण्यात आली असली तरी नागरिक भाविक भक्तांकडून दर्शनासाठी ये-जा चालू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 
   भाविकांना व नागरिकांना मंदिर परिसरात येण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून कासेगाव मध्ये येणारे सर्व रस्ते पोलिसांनी अडवले असून बाहेर जाण्यासाठी कॅनॉलच्या रस्त्याचा वापर करण्यात येत आहे परंतु कॅनॉलचे रस्ते वाहतुकीस अरुंद असल्याने ट्रॅक्टर ट्रॉली या ठिकाणी आल्याने पूर्ण वाहतुकीची कोंडी झाली आहे. सदर ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्यावर नागरिकांनी तेथे ट्रॅक्टर टाॅली आल्याने वाहन पुढे जात नाहीत आम्हास पुढे पंढरपूर ला जायचे आहे आपण आम्हास जाऊ द्या. त्यावर त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले आम्ही सोडणार नाही. आपण साहेबांना सांगा नागरीक साहेबांना संपर्क करत असताना साहेबांना फोन काय करता एस. पी. मॅडम करा नाही तर आय. आय.जी ला करा असे उद्धट वर्तन या पोलीस कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना दिले.
 वास्तविक पाहता वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर काही अडचण आल्यास पोलिस प्रशासनाने मदत करणे अपेक्षित असते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी नागरिकांना मदत करण्याऐवजी पोलीस कर्मचार्‍यांकडून असे उद्धट वर्तन ऐकावयास मिळाल्याने नागरिकांतून प्रवाशी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकारानंतर संबंधित व्यक्तीने सोलापूरच्या एस पी तेजस्विनी सातपुते यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही  त्यानंतर पंढरपूर येथील डीवाय एस पी कदम साहेब यांना संपर्क केला असता त्यांनी या घटनेची तात्काळ माहिती घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment