Breaking

Saturday, 1 January 2022

वरवडे प्रतिनिधी/ समीर मुलाणी - वरवडे- परिते रस्ता दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना निवेदन.


वरवडे: दिनांक 29/12/2021 उपअभियंता, 
सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुर्डुवाडी यांना निवेदन देताना
*वरवडे परिते रस्ता दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्यासाठी  कोणत्याही नेतेमंडळी चे लक्ष नाही आणि कोणी पाठपुरावा पण केला नाहीं तसेंच सार्वजनिक बांधकाम विभागाचे पण दुर्लक्ष आहे*, वरवडे परिते  संपूर्ण रस्ता सुमारे 15,20 वर्ष  झाली दुरुस्ती किंवा डांबरीकरण झालेले नाही, वरवडे, व्होळे, उजनी, भेंड, आकुंभे ,आहेरगाव, आदि गावातील लोकांना पंढरपूर देवदर्शनास जाण्यासाठी मोठी गैरसोय होत असून  वरवडे गावात  
रयत शिक्षण संस्थेचे महाविद्यालय असून विद्यार्थी, शेतकरी आदि लोकांचे येण्याजाण्यासाठी आतोनात हाल होत आहेत , सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर वरवडे परिते रस्ता दुरुस्ती करून डांबरीकरण करावे ,कृपया आपण आमच्या मागणीची दखल घ्यावी ही  नम्र विनंती. *अन्यथा युवा तालुकाध्यक्ष मा.नागेश भैय्या गायकवाड यांनी आंदोलचा ईशारा देताना रयत क्रांती संघटना माढा तालुक्याच्या वतीने तसेच जिल्हा संपर्क प्रमुख मा.प्रा.सुहास पाटील सर, जिल्हा अध्यक्ष मा.शशिकांत थोरात ,जिल्हा समनव्यक विठ्ठल आबा म्हस्के ,तालुकाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असे संबंधित अधिकारी यांना सांगितले* .
प्रसंगी  युवक जिल्हाअध्यक्ष मा. बाळासाहेब जगताप, युवा तालुकाध्यक्ष  मा.नागेश भैय्या गायकवाड 
उप तालुकाध्यक्ष प्रशांत सावंत,
वैभव दादा गायकवाड, महेश गायकवाड, स्वप्नील तळेकर आदी.

No comments:

Post a Comment