Breaking

Sunday, 9 January 2022

विशेष प्रतिनिधी/ महादेव गाडे - गंभीर व बेशुद्ध असलेल्या 12 महिला व मुलींचा जीव वाचविण्यात सिव्हिलला यश....जिल्हाधिकार्यांनी लावली चौकशी...घेतली रूग्णांची भेट.


गंभीर व बेशुद्ध असलेल्या 12 महिला व मुलींचा जीव वाचवण्यात सिव्हीलला यश | जिल्हाधिकाऱ्यांनी लावली चौकशी | घेतली रुग्णांची भेट

सोलापूर : मोहोळ शहरानजीक तांबोळे रोडवर असलेल्या निर्माण फर्टिलायझर्स ही खत तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीत कोळेगाव येथील डोंबारी समाजातील महिला व पुरुष काम करतात. दि ७ जानेवारी रोजी दिवसभर कंपनीत कामावर गेले असता त्या ठिकाणी खतामध्ये मिश्र करण्यासाठी आणलेले उग्र वासाची पावडर गाडीतून उतरवून सायंकाळी पाचच्या दरम्यान हे सर्व मजूर आपापल्या घरी गेले. घरी जाऊन बसेपर्यंत सर्वांना उलट्या व श्‍वसनाचा त्रास सुरू झाला. 

अनेक महिला बेशुद्ध पडल्या, त्यामुळे या सर्वांना नातेवाइकांनी तातडीने मोहोळ येथील गावडे हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार झाले नाही शेवटी त्यांना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले अतिशय गंभीर अशा परिस्थितीत हे रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले सिव्हिल प्रशासनाला याची माहिती मिळताच ए ब्लॉकमध्ये स्वतंत्र वार्ड या बेशुद्धावस्थेत असलेल्या महिला व मुलींसाठी तयार करण्यात आला,  त्याठिकाणी डॉक्टर पती-पत्नी धडके यांनी आवश्यक असलेले ऑक्सिजन आणि बायपॅप लावले, एका छोट्या मुलीला बालरुग्ण वार्डात दाखल करण्यात आले.

शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये भेट दिली. ए ब्लॉक मधील सर्व महिला-मुलींच्या तब्येतीची विचारपूस केली, यावेळी डॉक्टर धडके, डॉ अग्रजा चिटणीस, नियोजन अधिकारी दराडे हे सोबत होते. 




सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वेळेवर उपचार झाल्याने आज या सर्व महिला आणि लहान मुली सुखरूप आहेत, सिव्हिल प्रशासनाने तातडीने उपचार केल्याबद्दल जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सर्व डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफचे अभिनंदन केले. संबंधित खत कंपनीची समितीद्वारे चौकशी लावली असून सोमवारी अहवाल प्राप्त झाल्यानंतर बैठक घेऊन कारवाई करण्यात येईल कंपनी ऍक्‍टनुसार या सर्व महिला मुलींना आवश्यक ती आर्थिक मदत देण्याच्या आदेश काढणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

अतिशय गंभीर आणि बेशुद्धावस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या महिलांवर यशस्वीपणे उपचार झाले त्या सध्या सुखरूप आहेत हे चित्र पाहण्यासारखे होते, त्याचा आनंद सर्व डॉक्टर आणि हॉस्पिटल मधील स्टाफचा चेहऱ्यावर झळकत होता.

No comments:

Post a Comment