Breaking

Wednesday, 8 December 2021

संपादक/ विजयकुमार परबत - माढा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत करावी....शिवाजीराजे कांबळे यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन.


संपादक /विजयकुमार परबत - माढा तालुक्यातील अति पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत करावी....शिवाजीराजे कांबळे यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन - या बाबत सविस्तर वृत्त असे की माढा तालुक्यात 1ते 4 डिसेंबर दरम्यान अतिवृष्टी झाली होती, यामध्ये अनेक शेतकर्यांच्या फळबाग, द्राक्षे, कांदा, केळी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तरी सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे, त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत करावी असे लेखी निवेदन सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याणचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. 

या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचा कांदा करपून गेला, केळी, द्राक्षे, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच डाळींबावरती रोग आला आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे तरी जिल्ह्यातील शेतकरी वाचवायचा असेल तर त्यांना सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी, व शेतकर्यांवर आलेल्या आसमानी संकटातून त्याला वाचवावे, याकरिता नुकसान झालेल्या मका,केळी,डाळींब, कांदा, द्राक्षे, ऊस,ज्वारी,गहू, बोर, टोमॅटो , हरभरा इत्यादी पिकांचे पंचनामे करण्यात यावेत त्यामुळे शेतकर्यांना भरपाई च्या माध्यमातून हातभार लाभेल, व यासाठी कृषी विभागामार्फत पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत करावी अशा प्रकारचे निवेदन सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याणचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिले आहे.

No comments:

Post a Comment