Breaking

Thursday, 30 December 2021

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे - पडसाळी येथे महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत मोफत भोजन योजनेचा शुभारंभ.


पडसाळी (ता.माढा) येथे मध्यान्न भोजन योजनेचा मोठ्या  उत्साहात शुभारंभ......
                    पडसाळी (ता.माढा) येथे मध्यान्न भोजन योजनेचा मोठ्या  उत्साहात शुभारंभ करण्यात आला. श्री दत्त मजुर संस्था व महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार विभाग यांचे संयुक्त विद्यमाने पडसाळी येथे बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार, शेतमजुर यांचेसाठी असलेल्या भोजन योजनेचा शुभारंभ माजी सरपंच दत्तानाना फरड व भास्कर अप्पा देशमुख यांचे शुभहस्ते नारळ वाढवून करण्यात आला.
         यावेळी मा.सरपंच भास्कर देशमुख, दादासाहेब देशमुख, सचिन पाटील, भिकाजी थोरात, महावीर आबा मुटकुळे, दत्तात्रय देशमुख, संतोष पाटील, रामभाऊ सलगर, बंटु काका फरड, माजी ग्रा.पं.सदस्य सौ. पार्वती पाटील, सत्यवान शिंगाडे, लक्ष्मण देशमुख, सर्जेराव देशमुख, दत्तराज मुटकुळे, विजय मगर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख,तात्यासाहेब फरड, शंकर देशमुख, दत्तात्रय मुटकुळे, दत्तात्रय नागन्नाथ मुटकुळे, भरत पाटील, महेश पाटील, आण्णासाहेब मुटकुळे, बालाजी पाटील, भारत सुतार, पिंटु सलगर, बालाजी फरड, जयकुमार मुटकुळे, सचिन मुटकुळे, पांडुरंग माळी, हरी पाटील, बापू सलगर, सिताराम बप्पा मुटकुळे, सिध्देश्वर देशमुख, नारायण थोरात, सिध्देश्वर थोरात, अजिंक्य पाटील, गोल्डन देशमुख, ऋषिकेश देशमुख, विजयानंद देशमुख, सदाशिव फरड, ज्ञानेश्वर फरड, मारुती फरड, अक्षय पाटील, गणेश मुटकुळे, लखन पवार, बाबुराव थोरात, नरहरी थोरात, हरीबा थोरात यांसह अनेक मान्यवर व गावकरी उपस्थित होते.
        सदर मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा तसेच ही योजना पुढे चालु ठेवण्यासाठी व रोजचे वाटपाचे नियोजन करण्याकरिता कै. सुरेश (बापू) पाटील प्रतिष्ठान व कै. अशोक (काका) देशमुख प्रतिष्ठान पडसाळीचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेणार असल्याचे श्री दत्त मजुर संस्थेचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment