Breaking

Thursday, 30 December 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार - पंढरपूर सिंहगडच्या डाॅ.बाळासाहेब गंधारे यांना आंतरराष्ट्रीय स्टेअर अवार्डस्....


*पंढरपूर सिंहगडच्या डाॅ. बाळासाहेब गंधारे यांना आंतरराष्ट्रीय "स्टेअर अवॉर्ड्स"*
कोर्टी (ता.पंढरपूर) एस. के.एन. सिहंगड कॉलेज इंजिनीअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात कार्यरत असलेले  प्राध्याक डॉ. बाळासाहेब शहाजी गंधारे यांना "सायन्स अँड टेकनॉलॉजी अकॅडेमिक, इनोव्हेशन अँड रिसर्च अवॉर्ड्स २०२१" (स्टेअर अवॉर्ड्स) हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार "औद्योगिक अभियांत्रिकीतील उल्लेखनीय प्रबंध" या कार्यासाठी प्रदान करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
    स्टेअर अवॉर्ड्स हा नामांकित आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून तपासणी करून प्रबंधांवर आधारित शोधनिबंध, प्रबंधाची गुणवत्ता आणि उपयुक्तता यांच्या आधारे प्रदान करण्यात येतो. डॉ  गंधारे यांनी नॅशनल इन्स्टिटूट ऑफ इंन्डस्ट्रीयल इंजिनिअरिंग, मुंबई (निटी, मुंबई, भारत सरकारच्या एज्युकेशन मिनिस्ट्रीच्या) या नामांकित संस्थेमधून डॉ. मिलींद अकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली "इव्यप्लूशन ऑफ मॅनटेन्सस् परफोर्मन्स् ऑफ सिलेक्ट ऍग्रोबेस्ड इन्डस्ट्रिज" हा प्रबंध सादर केला होता. ह्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी १८ विविध देशातील सायन्स अँड टेकनॉलॉजी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राध्यापक आणि संशोधक यांना पुरस्कारांनी मानांकित करण्यात आले. या पुरस्कारासाठी १०६ विद्यापीठांमधून ३७ विजेत्यांची निवड करण्यात आली होती.  त्यामध्ये डॉ.  गंधारे यांनाही समाविष्ट करण्यात आले. त्यांचे समाज उपयोगी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान जागतिक पातळीवर सन्मानित करून त्याची दाखल घेण्यात आली. पुढील भविष्यात विद्यार्थ्यांच्या बरोबर संशोधन करून समाज उपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्याचा त्याचा मानस आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचा प्राचार्य डॉ. कैलाश करांडे , उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. शाम कुलकर्णी यांच्या सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment