कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील प्रा. समीर कटेकर आणि प्रा. सुधा सुरवसे या दोन प्राध्यापकांना सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाकडून प्रत्येक ८० हजार रुपये संशोधन निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड महाविद्यालयाकडून मागील वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामधून संशोधनास अर्थसाहाय्य देण्यासाठी सीड मनी या योजनेंतर्गत प्रस्ताव मागविण्यात आले होते. यामध्ये एस. के. एन. सिंहगड अभियांञिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील प्रा. समीर कटेकर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील प्रा. सुधा सुरवसे यांनी प्रस्ताव दाखल केले होते. सदर प्रस्ताव विद्यापीठ स्तरावर व बाहेरील स्तरावरून निवड करण्यात आली आहे असुन दोन प्राध्यापकांना प्रत्येक ८० हजार याप्रमाणे संशोधन निधी मिळणार आहे. यामुळे महाविद्यालयातील संशोधनास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. प्रा. समीर कटेकर यांनी मेकॅनिकल क्षेञाशी निगडित असलेल्या "पार्टिकल डम्पिंग व्हायब्रेशन" या विषयावर प्रस्ताव सादर केला होता तर प्रा. सुधा सुरवसे यांनी "इमारतीचे होणारे नुकसान अगोदर ओळखण्याचे संशोधन" या विषयावर प्रस्ताव सादर केला होता. या दोन प्रस्तावास विद्यापीठाने मान्यता दिली असुन प्रत्येक ८० हजार अनुदान मिळणार आहे.
प्रत्येक वर्षी महाविद्यालयाला संशोधनासाठी निधी प्राप्त होत असल्याने महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण होत आहे. भविष्यात जास्तीत-जास्त संशोधन निधी उपलब्ध होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग प्रयत्न करीत आहेत.
या संशोधन निधीचा फायदा पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील प्राध्यापक व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी खुप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाकडून निधी प्राप्त केल्याबद्दल संशोधनास यांचे महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी सह सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.


No comments:
Post a Comment