ओमिक्रॉनमुळे राज्यात जमावबंदी लागू; वाचा नवी नियमावली
राज्यातील कोरोना परस्थिती पुन्हा ढसळण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनची वाढणारी रुग्णसंख्या पाहता राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच टास्क फोर्सची बैठक घेतली. त्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आलाय. यासंदर्भात अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होणार आहे.
राज्यातल्या कोविडरुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर आज टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज 24 रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.ओमिक्रॉनची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर बैठका घेतल्या. या आढावा बैठकांमधून येणाऱ्या 15 दिवसांचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती मिळते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ओमिक्रॉनचा पीक पिरेड असण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. त्या अनुषंगाने पावलं उचलण्यात येत आहेत.
नक्की काय घडलं टास्क फोर्सच्या बैठकीत?राज्यभरात रात्रीची जमावबंदी लागू होणार५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत आज दुपारपर्यंत राज्यशासन नवी नियमावली जाहीर करणार ३१ जिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर रात्रीची जमावबंदीफटाके फोडता येणार नाहीत, आतषबाजी नाही लग्नसमारंभ, कार्यक्रम यांवरही निर्बंध१०० जणांनाच परवानगी, आधी ही मर्यादा २०० होती.
बंदिस्त जागेतील कार्यक्रमसमारंभ , लग्न, इतर कार्यक्रम यांसाठी 100 लोकांनाच परवानगी२५% किंवा १०० यामध्ये जी कमी ती मर्यादा लागूओपन ५०% किंवा १०० यामध्ये जी कमी ती मर्यादा लागू100 लोकांनाच परवानगीरेस्टरंट- 50% क्षमतेनच सुरु राहणारप्रशासनाचं आता हॉटेल ,रेस्टॉरंटकडे बारकाईनं लक्ष असेल
मुंबईची स्थिती काय?३ महिन्यांनंतर मुंबईत अचानक स्पाईकऑक्टोबरमध्ये मुंबईतील दरदिवशी वाढणारी रुग्णसंख्या ५५० -६०० होती...३ महिन्यांनंतर रुग्णसंख्यावाढ बघायला मिळतेय मुंबईत दरदिवसाला 45 हजार टेस्टींग होत आहेत काल बैठकीत टास्क फोर्सचा भर कशावर होता?जलद लसीकरण मोहीमबुस्टर डोस बाबत केंद्राकजे पाठपुरावा करणे, किमान हेल्थ/फ्रंटलाईन वर्कर्सला बुस्टर डोस मिळावाकेंद्राकडे लहानमुलांच्या लसिकरणासाठी पाठपुरावा करावा.


No comments:
Post a Comment