सेवानिवृत्तीदिनी सहायक फौजदारास बढती; वर्दीवर स्टार चढताच दिला प्रेमाचा निरोप
V B P न्यूज नेटवर्क 1, 2021 11:33 AM
पोलीस उपायुक्तांची अनोखी भेट : दोन वर्षांपासून रखडलेली पदोन्नती शेवटच्या दिवशी
सेवानिवृत्तीदिनी सहायक फौजदारास बढती; वर्दीवर स्टार चढताच दिला प्रेमाचा निरोप
सोलापूर : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली पदोन्नती अखेर सेवानिवृत्तीच्या दिवशी झाली. हवालदाराला सहायक फौजदार म्हणून बढती देण्यात आली, मात्र ड्युटीचा शेवटचा दिवस होता अन् चंद्रकांत सिद्रामप्पा जक्कापूरे हे सेवानिवृत्त झाले. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांनी शेवटच्या दिवशी अनोखी भेट दिली.
गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यासह जवळपास २२ हवालदार पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. २२ जणांनी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांना भेटून माहिती दिली आणि अडचणी मांडल्या होत्या. डॉ. दीपाली धाटे यांनी तत्काळ सर्व कर्मचाऱ्यांची सर्व माहिती क्लर्ककडून मागवून घेतली. ज्यांना शक्य आहे अशा पोलीस हवालदार चंद्रकांत जक्कापुरे यांच्यासह सहा जणांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव पोलीस आयुक्त हरिष बैजल यांच्याकडे दिला. त्यांनी अवघ्या काही तासांतच तो मंजूर केला.


No comments:
Post a Comment