*पंढरपूर सिंहगडच्या प्रणव तारेची दोन मल्टिनॅशनल कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड*
कोर्टी (ता.पंढरपुर) येथील एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या प्रणव प्रदीप तारे यांची दोन मल्टिनॅशनल कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अगदी माफक फी मध्ये जागतिक दर्जाच्या सर्व सेवा-सुविधा पंढरपूर सिंहगड मध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांचे कौशल्य ओळखुन त्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव देण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने "आंतरराष्ट्रीय सिंहगड सोलार व्हेईकल चॅम्पियन शिप" आयोजित केली होती. ही "आंतरराष्ट्रीय सिंहगड सोलार व्हेईकल चॅम्पियन शिप" आयोजित करणारे सिंहगड महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर आहे. अशा वेगवेगळ्या २ कंपनीत सिंहगड महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील प्रणव प्रदीप तारे ह्याची "इन्फोसिस" कंपनीत निवड झाली असुन कंपनीकडून ३.६० लाख वार्षिक पॅकेज आणि "टीएटो इंडिया" कंपनीत ४.५० लाखाचे वार्षिक पॅकेज मिळणार असुन प्रणव प्रदीप तारे हे "इन्फोसिस" या कंपनीत नोकरी करणार असल्याचे त्यांनी यादरम्यान सांगितले आहे.
दोन आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीत निवड झालेल्या प्रणव तारे याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. नामदेव सावंत, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


No comments:
Post a Comment