एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी "एआय,एमएल अँड डी एल" म या विषयावर ऑनलाईन वेबिनार सुरेंद्र पापणलिया अध्यक्ष जीकेटीसीएस, पुणे यांनी गुगल मिट च्या माध्यमातून दिला. यामध्ये त्यांनी समाजातील अडचणी दूर करण्यासाठी "एआय,एमएल अँड डी एल" हा विषय कसा वापरला जाऊ शकतो हे सांगून काही प्रात्यक्षिकही दाखविले.
हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सर्व प्राध्यापक आणि विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत यांनी परिश्रम घेतले. प्रा. नामदेव सावंत यांनी या विषयावर वेबिनार घेण्याची मुख्य गरज काय आहे हे संबोधित केले आणि त्याचा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे फायदा होईल हेही नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समन्वयक प्रा. सुभाष पिंगळे यांनी केले.


No comments:
Post a Comment