"एसटीच्या मागण्या आणि अपयशी पवार.."
चारदा मुख्यमंत्रीपद भूषविलेले शरद पवार म्हणजे माध्यमांनी फुगवलेला एवढा मोठा फुगा असेल कधीच वाटलं नव्हतं.
ज्या तोंडाने जनतेने आम्हाल नाकारलं हे स्पष्टपणे सांगितलं त्याच तोंडाने मविआसाठी आग्रह धरला तेंव्हा ना त्यांच्या समर्थकांनी त्यांना विचारलं ना माध्यमांनी, कि तुम्ही असं का करताय?
राजकारणाच्या पटलावर भाजपसोडून इतर पक्षीय समर्थकांना गुलाम का म्हटलं जातं? तर अगदी त्यांच्या नेत्यांनी पाद जरी सोडली तर ती भरभरून आपापल्या कुपीत घेऊन आयुष्यभर तोच वास आपल्या अंगावर शिंपडून मोक्ष मिळाला म्ह्णून जगभर नाचण्याचं सामर्थ्य राखतात म्ह्णून. आणि बऱ्याचदा भाजपनेत्यांना त्यांच्याच समर्थकांचे भय वाटत असावं..
मुद्द्यावर येतो. जनमताला बांबूची वने लावून जेंव्हा तुम्ही शासन लादता तेंव्हा प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तुमची असते. जो काही गोंधळ माजतो त्याची जबाबदारी, पत्रकारांना, संपादकांना फ्लॅट वगैरे देऊन तुमच्या अंगावर पडणार नाही ह्याची काळजी तुम्ही घेत असता, पण करोडो जनतेला कसं मॅनेज करणार?
मुळात शरद पवारांना आत्तापर्यंत एकाही समस्येवर समाधान मिळालेलं नाहीये. सतत सत्तेत असणाऱ्या ह्या माणसाकडे ती दृष्टीच नाही.. पाणी भरपूर असलेल्या जागेत शेतीची भरभराट करणारा कृषिभूषण नसतो तर वाळवंटात बागायती पीक घेणारा असतो.
एवढा दीर्घ सत्तेत असणारा माणूस एसटीकर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवू शकत नाही म्हणून संबंधितांना देवेंद्र फडणवीसांच्या पायी लोळण घ्यावी लागते, ह्याची जरा सुद्धा लाज वाटत नाही?
फडणवीसांकडे जवळपास प्रत्येक समस्येचा उपाय असतो, जी समस्या पवारांनी सोडवणं गरजेचं आहे. फडणवीसांची सध्याची बाईट पहा, त्यात ते संबंधित सल्ला/उपाय दिल्याचं सांगतात. पवार तसं काही बोलतात का?
फडणवीसांच्या विलीनीकरणाच्या मताचे स्क्रीनशॉट्स इनबॉक्सात पाठवणार्या गुलांमांना एवढी तरी अक्कल हवी की फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत. सत्तेत नाहीत.
मुख्यमंत्री गायब, सत्तेचा दीर्घ अनुभव असलेले मस्तपैकी स्पॉट नानाची, क्षमा करा, अनिल परबांची मजा घेत बसलेले असताना शरद पवार का पुढे येत नाहीत? ही त्यांचीच जबाबदारी आहे.
गंभीर आजारपणातसुद्धा मुंबई-अहमदाबाद-दिल्ली-मुंबई असा प्रवास करणारे आझाद मैदान त्याच मुंबईत मंत्रालयाशेजारी आहे हे सोयीस्कर विसरले का? लाखो कार्यकर्त्यांची नावे, कुंडली, ग्रह ह्या माणसाला पाठ आणि लक्षात असतं म्हणून शंभरदा कौतुक ऐकलंय. मग एवढया मोठ्या आझाद मैदानाचा पत्ता ते विसरले?
हे प्रश्न त्यांचे "आजीव" गुलाम, सगळीकडे "लक्ष" असणारे, आणि त्यांच्या कौतुकाचे "पुराण" सांगत फिरणारे विचारत नाहीत म्ह्णून सोशल मिडियातून ह्यावर सतत बोलणं गरजेचं आहे..
जगातल्या सर्व समस्येचं समाधान म्हणजे साहेब, अशी धारणा असणारे त्यांना "त्यांच्या नाकाखालच्या खात्याची शकले दिसत नाहीत" हे कधीही स्विकारत नसतात पण इतिहासपुरुष सगळ्याची नोंद अगदी व्यवस्थित घेत असतो..
राजकारणाऐवजी डेली सोपमध्ये काम केलं असतं तर "तिकडे" इतिहास घडवला असता, पन्नास वर्षे घालवून..
- चेतन दीक्षित 🖋Chetan Dixit


No comments:
Post a Comment