Breaking

Saturday, 20 November 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार - सिंहगड महाविद्यालयात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध....प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे.


पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध- प्राचार्य डॉ.कैलाश करांडे.

महाविद्यालयातील विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत: प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांची माहिती



अभियांत्रिकीचे शिक्षण हे इंजिनिअर होण्यापुरते अथवा पदवी घेण्यापुरते मर्यादित न ठेवता ते भविष्याचा वेध घेत जगभरात होऊ घातलेल्या वेगवान बदलांना समर्थपणे व आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडविणे त्यासाठी त्यांना सर्वागीण विकासाच्या संधी बरोबर विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये उपलब्ध असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना  सांगितले.
    अल्पावधीतच महाविद्यालयाने सातत्यपूर्ण निकाल, प्लेसमेंट मधील दमदार वाटचाल, शासकीय व निमशासकीय नोकरीच्या संधी याशिवाय उद्योजक क्षेत्रातील अनेक करिअरच्या संधी आजपर्यंत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाने अनेक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. सिंहगड संस्थेने आपला शैक्षणिक क्षेत्रातील ठसा जगभर उमटवला आहे. सिंहगड संस्थेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थीना जगातील नामांकित कंपनीत सहजरीत्या प्लेसमेंटची संधी प्राप्त होते. सिंहगड संस्थेचे खास वैशिष्ट्य म्हणजे हि संस्था राजकारण विरहित आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत असलेले कौशल्य बाहेर येण्यासाठी महाविद्यालय प्रोजेक्ट बेस लर्निंग काळाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रकल्प धारितशिक्षण शिक्षण देत आहे.
   विद्यार्थ्यांचा सर्वांगिंण विकास कसा होईल याकडे महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग जातीने लक्ष देत असतात. दर्जेदार शिक्षणा बरोबरच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाठी निसर्ग-रम्य असे वातावरण असुन विद्यार्थ्यांना अभ्यासाठी स्वतंञ हॉल उपलब्ध आहेत. याचबरोबर सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम महाविद्यालयात प्रत्येक वर्षी राबवले जात असल्यामुळे  महाविद्यालयातील विद्यार्थीना आपले कला-कौशल्य सादर करण्यासाठी वाव मिळतो. टीचर- गार्डियन पद्धती नुसार प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांची दर्जेदार बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्लेसमेंट सेंट्रल प्लेसमेंट व लोकल प्लेसमेन्ट मध्ये आज पंढरपूर सिंहगडचा विद्यार्थी हा सिंहगड या ब्रँड वरच मोठ्या प्रमाणात निवडले जात आहे.
    विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षण न देता तसेच परीक्षार्थी न बनविता भारताचा एक सुज्ञ व सुजाण नागरिक बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून पंढरपूर सिंहगड महाविद्यालय शिक्षण देत आहे. अशा या महाविद्यालयात आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडले आहेत. भविष्यात ही जास्त जास्त विद्यार्थ्यांना नामंकित बहुराष्ट्रीय कंपनीत प्लेसमेंट देण्यासाठी सिंहगडचे प्रयत्न असतील.

No comments:

Post a Comment