पंढरपूर सिंहगडच्या ऐश्वर्या सांगडे हिला ४.५ लाखाच्या पॅकेजची नोकरी.
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कुमारी ऐश्वर्या युवराज सांगडे यांची "पर्सिस्टेंस सिस्टम" या नामांकित कंपनीत निवड झाली असुन कंपनीकडून ४.५ लाखाचे वार्षिक पॅकेज मिळणार असल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत यांनी दिली.
"पर्सिस्टेंस सिस्टम" ही एक भारतीय बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीची बॉम्बे स्टाॅक एक्सचेंज आणि नॅशनल स्टाॅक एक्सचेंज मध्ये नोंद आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील कुमारी ऐश्वर्या सांगडे हिची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून तीला ४.५ लाखाचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
"पर्सिस्टेंस सिस्टम" या नामांकित कंपनीत निवड झालेल्या ऐश्वर्या सांगडे हिचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


No comments:
Post a Comment