*पंढरपूर सिंहगडला प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेशास विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद*
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून चालू शैक्षणिक वर्ष म्हणजे २०२१-२२ साठी राज्यामध्ये पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू असून या प्रवेशासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या विश्वास पाञ ठरले आहे. नियमानुसार नुसार शैक्षणिक फी आकारून शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत सर्वाधिक प्लेसमेंट पंढरपूर सिंहगडने विद्यार्थ्यांना दिले आहे. याशिवाय कोविड-१९ या संसर्गजन्य रोगराई च्या कालावधीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनुसार शिक्षण देऊन गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम, संशोधन परिषद आयोजित करण्यात आल्या होत्या.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात हे राजकारण विरहित महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांच्या व पालकांचा कल हा सिंहगड कॉलेज मध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी ओढा आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून शिक्षण दिले जात आहे.
चालू शिक्षण वर्षात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाचे अतीशय सुंदर कॅम्पस व शैक्षणिक गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद अशा अनेक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. याशिवाय प्लेसमेंट मधुन १० लाखाचे वार्षिक पॅकेज मिळणारे सिंहगडचे सर्वाधिक विद्यार्थी आहेत तसेच कोरोना कालावधीत महाविद्यालयाने २०० हून अधिक ड्राईव्ह घेऊन विद्यार्थ्यांना सर्वाधिक प्लेसमेंट दिले आहे. महाविद्यालयातील विविध उपक्रम, सोलापूर विद्यापीठाचा "उत्कृष्ठ प्राचार्य" पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांना मिळाला असून याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल १० हून अधिक पुरस्कार प्राचार्य यांना मिळाले आहेत. हे सर्व लक्षात घेऊन चालू शैक्षणिक वर्षांत उदंड प्रतिसाद दिला आहे.
पंढरपूर "सिंहगड पॅटर्न" अभियांत्रिकी शिक्षणात अव्वल स्थानावर आहे.
विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम, वेबिनार राबविले जात आहेत यातूनच भारताचा सुजाण नागरिक घडविण्याचे काम पंढरपुर सिंहगड मोठ्यात दिमाखात करीत आहे.
आहे. विद्यार्थ्यांचा सक्षम भारताचा परफेक्ट इंजिनिअर व उत्कृष्ठ नागरिक घडविण्यासाठी सिंहगड वचनबद्ध असुन सेन्ट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट माध्यमातून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
कंपन्यात तसेच प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या
सिंहगड महाविद्यालयाची सर्वाधिक आहे. याशिवाय उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग, अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, अद्ययावत सुविधा, विद्यार्थ्यांसाठी
वसतिगृहांची विशेष सोय, परिसरातील स्वच्छता, विविध शासकीय योजना या सर्व बाबींमुळे पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या विश्वासास पात्र ठरले असल्याने चालू शैक्षणिक वर्षांत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली असल्याचे दिसुन आले आहे.


No comments:
Post a Comment