Breaking

Sunday, 14 November 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी /अमिर आतार - सिंहगडच्या 3 विद्यार्थ्यांची दुबईच्या कंपनीत निवड.


*पंढरपूर सिंहगडच्या ३ विद्यार्थ्यांची दुबईच्या कंपनीत निवड*



एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर येथील महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या ३ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती "डेटा फी" चे मॅनेजिंग पार्टनर आनंद प्रकाश पुजारी यांनी दिली.
    "डेटा फी" हि दुबई येथील सुप्रसिद्ध कंपनी आहे. जी अँनालिटिक्स आणि मशीन लर्निंग मध्ये सेवा देते. या कंपनीचे मुख्यालय दुबई मध्ये आणि भारतातील बंगळूर मध्ये ऑफशोर सेंटर आहेत. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील मीरा जाधव, पायल चौगुले आणि रोहिणी बागल या तीन विद्यार्थिनीची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली असुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २.४ लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
    पंढरपूर सिंहगड सारख्या ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुबई येथील नामांकित कंपनीत नोकरी करण्याची संधी प्राप्त झाली असल्याने पालक वर्गात आनंद व्यक्त होत आहे. दुबई येथील कंपनीकडून पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात ऑनलाईन कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता या ड्राईव्ह मधुन पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखती मध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, कमालीची शिस्त, कंपनीला आवश्यक असलेले ज्ञान हे पंढरपूर सिंहगड मधील विद्यार्थ्यांकडे आहे. यामुळेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुबई येथील "डेटा फी" कंपनीत काम करण्याची संधी प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
  "डेटा फी" या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment