Breaking

Sunday, 14 November 2021

विशेष प्रतिनिधी/ महादेव गाडे- आद्यक्रांतिकारक क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्ताने प्रबुद्ध भारत तरूण मंडळाच्या वतीने विनम्र अभिवादन.


                      

*आद्यक्रांतीकारक क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्ताने प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने विनम्र अभिवादन*


*सोलापूर*:- आज दिनांक 14 नोव्हेंबर 2021 सकाळी 10 वाजता प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर,बुधवार पेठ येथे आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्ताने प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस शाहू-फुले-आंबेडकर विचारांचे गाढे अभ्यासक श्रीमंत (आप्पा) जाधव यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी *प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद दादा चंदनशिवे* यांनी आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, महात्मा फुले यांनी पुणे शहरात जी पहिली शाळा काढली त्या शाळेत पहिल्या विद्यार्थिनींचा मान लहुजी वस्ताद साळवे यांच्या कुटुंबातील मुक्ताबाई साळवे यांना घेतला व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून एक समाजाला नवी दिशा क्रांती देणारे लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांच्या काळामध्ये सुद्धा फार मोठे समाज सुधारण्याचे काम लहुजी वस्ताद साळवे यांनी केलेले आहे. या भागाचा नगरसेवक म्हणून त्यांना मी आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांना कोटी कोटी अभिवादन करतो, असे म्हणत आनंद दादा चंदनशिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
        तसेच यावेळी श्रीमंत आप्पा जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या विषयी सांगताना म्हणाले की, महापुरुषांची जयंती साजरी करण्याचा हेतू म्हणजे महापुरुषांनी केलेल्या कार्याचा आढावा अभ्यास व चिंतन केल्यानंतर समाज घडत असतो. अशा पद्धतीने गेले 15 वर्ष आनंद दादा चंदनशिवे यांनी महापुरुषांचा आढावा व त्यांचे विचार सतत करत असल्याने मला अतिशय आनंद होत आहे. लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याचा आढावा घेत असताना पेशवाई काळामध्ये मागासवर्गीयांना शिक्षणापासून वंचित ठेवले होते. यामुळे महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणे येथे पहिली महिलांसाठी शाळा काढली या शाळेत आपल्या घरातील व्यक्तीस शाळेमध्ये प्रवेश घेऊन समाजामध्ये क्रांती घडवली व सावित्रीबाई फुले समाजात मध्ये शिक्षण देण्याचे काम करत असताना त्यांना संरक्षण देण्याचे योगदान आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांनी केले आहे. असे म्हणत आपले मनोगत श्रीमंत (आप्पा) जाधव यांनी व्यक्त केले.
        यावेळी उपस्थित सचिन शिराळकर, अतिश गवळी, अरविंद गायकवाड, अजय इंगळे, चित्रकार हुसेन शेख, कपिल मस्के, करण वडवे, प्रतिक चंदनशिवे, रोहित सोनवणे, विशाल प्रक्षाळे, सतिश अडाकूल आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment