Breaking

Wednesday, 6 October 2021

मोडनिंब अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा श्रीपूर येथे वर्धापन दिन साजरा.


*श्रीपूर*
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा 64*वा वर्धापन दिन आज सायंकाळी सात वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रीपूर शहरं शाखा युवा आघाडी यांच्या वतीने  साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम बाबर यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वाटचालीत कशी सुरुवात झाली याचे सविस्तर विश्लेषण केले रिपब्लिकन पक्ष भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत त्याची आखणी नियोजन व त्याच स्वरुप काय असावे हे ठरवण्यात आले  परंतु दुर्दैवाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचें अचानक महापरिनिर्वाण झाले  त्यानंतर तीन आकटोबरला या पक्षाची स्थापना केली त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष एन शिवराज होते  बाबर यांनी चळवळीतील वाटचालीत कर्मवीर दादासाहेब गायकवाड राजाभाऊ खोब्रागडे बी सी कांबळे  एन शिवराज व इतर मान्यवर नेत्यांनी रिपब्लिकन पक्ष चालवला परंतु गटबाजी व दुही मुळे रिपब्लिकन पक्ष फुटला तो गटातटात विभागला अशी माहिती दिली  केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा पक्ष फक्त दरवर्षी रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन साजरा करतो असा उल्लेख त्यांनी केला राज्य सरचिटणीस लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात रिपब्लिकन पक्ष मोठ्या ताकदीने कार्यरत आहे सर्वांनी एकजुटीने रिपब्लिकन पक्षाचे काम प्रामाणिकपणे करण्याचे त्यांनी आवाहन केले यावेळी पक्ष वर्धापनदिनानिमित्त कार्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून केक कापून तोफा उडवून जल्लोष केला  यावेळी शहर अध्यक्ष बापूसाहेब पोळके युवा आघाडीचे अध्यक्ष विश्वजीत भालशंकर यांनी विशेष पुढाकार घेऊन येथील ज्येष्ठ कार्यकर्ते युवा कार्यकर्ते यांना एकत्रित निमंत्रित केले तुकाराम बाबर बी टी शिवशरण सतीश लांडगे  अनिल आठवले रमेश भोसले राजरत्न नाईकनवरे संजय भोसले राजाभाऊ सुरवसे गौतम लोंढे विकी लंगडे प्रभाकर सुरवसे राजू गायकवाड महादेव सावंत गणेश सावंत  अप्पा लोंढे समाधान लांडगे दावल लोंढे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment