Breaking

Sunday, 3 October 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते - गरीबाच्या घराला नांगर लावाल तर आमच्याशी गाठ...शहाजीराजे गोडसे.


*गरीबांच्या* *घराला* *नांगर* *लावाल* *तर* *आमच्याशी* *गाठ* : शहाजीराजे गोडसे
वडूज गुरसाळे ता. खटाव येथे सुरू असणाऱ्या रस्त्याच्या कामामुळे काही गरीब नागरिकांची घरे कोणताही विचार न करता घरे पाडण्याचा फतवा प्रशासनाने काढला होता,परंतु येथील कुटूंबियांना भेट देऊन,त्यांच्या समस्या जाणून घेऊन जर येथील गोरगरीब, शेतकरी, मजुरांच्या घराला हात लावाल तर आमच्याशी गाठ आहे असा इशारा वडूज नगरपंचयातीचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यानी दिल्यानंतर,प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढत कोणत्याही घराची मोडतोड न करता रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन शहाजीराजे गोडसे यांना दिले
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सद्या राज्य मार्ग क्र.१४७ या रोड रुंदीकरणचे काम सध्या सुरू आहे.या रस्त्यावर गुरसाळे गावात सिटी सर्व्ह ला नोंद असणाऱ्या गरीब नागरिकांची घरे आहेत.दोन्ही बाजूला दीड फूट सोडून चाळीस फुटाचा रस्ता होऊ शकतो.यामध्ये रस्ता रूंदीकरणला कोणताही अडथळा होत नाही. परंतु काहींनी जाणून बुजून घरे पडण्याचा कट रचला होता. याबाबत येथील नागरिकांनी शिवसेनेचे वडूज नगरपंचयात विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांच्याकडे धाव घेत त्यांना आपली कैफियत सांगितली.
यावर शहाजीराजे गोडसे यांनी तातडीने शिवसेना उपतालुकाप्रमुख महेश गोडसे, बाळासाहेब जाधव,शहर प्रमुख सुशांत पार्लेकर,विभाग प्रमुख आबासाहेब भोसले,सुधीर माने आदि सह गुरसाळे घाटले आणि यावर संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांना यांच्याशी संपर्क साधून यावर तोडगा काढा,नाहीतर आम्ह आंदोलन करू असा इशारा दिला यावर लगेच अधिकाऱ्यांनी धसका घेत यावर योग्य ती उपाययोजना करत काम केले जाईल असे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment