Breaking

Tuesday, 19 October 2021

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार - दि.30/10/2021 रोजी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते वाखरी येथे आळंदी-मोहोळ या राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन.


येणाऱ्या 30 तारखेला केंद्रीय मंत्री माननीय श्री नितिन गडकरी साहेब यांचे हस्ते आळंदी मोहोळ या राष्ट्रीय महामार्गाचे वाखरी येथे उद्घाटन होणार आहे,
माननीय नितीनजी गडकरी साहेब  मध्ये कऱ्हाड येथे एका कार्यक्रमात आले होते ,तेव्हा विधानपरिषद आमदार श्री प्रशांतजी परिचारक साहेब यांनी त्यांचे कडे उद्घाटन ची तारीख मागितली होती, त्यावेळी खासदार श्री नाईक-निंबाळकर, श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष श्री अतुलजी भोसले, आमदार श्री समाधान दादा आवताडे,आदी उपस्थित होते.
      काल मा गडकरी यांच्या कार्यालयात असणारे अधिकारी येऊन पंढरपूर येथे पाहणी करून आमदार श्री परिचारक यांचेशी चर्चा करून कार्यक्रम निश्चित करण्यात आले असल्याचे खात्रीपूर्वक वृत्त असून,त्यानुसार वाखरी येथे उद्घाटन सोहळा व पंढरपूर येथे रेल्वे ग्राउंड वर गडकरी साहेब यांची सभा असे होणार आहे,या प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, पालकमंत्री श्री दत्ता मामा भरणे, खासदार श्री डॉ जय सिद्धेश्वर स्वामी, श्री निंबाळकर, आमदार श्री परिचारक, श्री आवताडे,आदी उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment