राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदारांना धान्य भेट
प्रतिनिधी
माढा तालुक्यातील केशरी पिवळे बीपीएल विभक्त शिधापत्रिका धारकांना धान्य मिळत नसल्याने राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदार राजेश चव्हाण याना धान्य भेट आंदोलन करण्यात आले. तहसीलदार राजेश चव्हाण उपस्थित नसल्याने आंदोलन अधिक भडकले.
कोरोना महामारी मुळे आधीच नागरिकांचे आर्थिक अडचणीमुळे कंबरडे मोडले आहे यातून कसेबसे जीवन जगत असताना आर्थिक अडचण जरी असली तरी शासनाचा रेशन कार्ड वरील अन्नधान्य धान्य मिळत नसल्याने गोरगरीब नागरिकांना उपासमारीची वेळ आली आहे.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप गडदे संघटक मंत्री ज्ञानेश्वर तालुक्यात विधानसभा अध्यक्ष धनाजी कोकरे तालुका अध्यक्ष गोरख वाकडे वैभवी भिसे अभिजीत सोलंकर श्यामल माने आजिनाथ नवले तालुका संपर्कप्रमुख अर्जुन शिंदे बाबाजी जाधव तानाजी जाधव सागर सातपुते पांडुरंग कोळी केशव दळवी सदाशिव जाधव बाबुराव घोडके नागनाथ सातपुते ज्ञानेश्वर सोनवणे दत्ता पाटील दादा सोनवणे दीपक शिंदे नितीन सातपुते अक्षय घोडके हनुमंत कांबळे सुरज गायकवाड सद्दाम पटेल भाऊ गायकवाड किरण अस्वरे कैलास खिल्लारे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली यामुळे तहसीलदार परिसर दणाणून गेला.
यामध्ये केशरी पिवळे बीपीएल अंतोदय रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड वरील धान्य मिळत नाही ते त्वरित मिळावे अन्यथा पुन्हा आंदोलन अधिक तीव्र पद्धतीने केले जाईल असे दिलीप गडदे यांनी सांगितले.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद चंद्र पवार साहेब यांच्या हस्ते राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता परंतु याचा फायदा महाराष्ट्रातील नागरिकांना मिळत नाही. नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.


No comments:
Post a Comment