Breaking

Tuesday, 7 September 2021

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी/ सचिन खंदारे - शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी फुलवली शिक्षक बाग.


शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी फुलवली शिक्षक बाग. 

फलटण (प्रतिनिधी) दि. 6
येथील मुधोजी महाविद्यालयातील बी.बी.ए.च्या विद्यार्थीनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात प्रत्येक शिक्षकांच्या नावाने एक एक झाड लावून वृक्षारोपण करून एक अनोखा शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
          संपूर्ण जगावर कोरोना सारख्या महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाही आपल्या शिक्षकां प्रती आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे उस्फूर्तपणे आयोजन करण्यात आले होते.शैक्षणिक क्षेत्रात ऑनलाइन पद्धतीने चालू असताना आदर्श घ्यावा असा एक स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त केला यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्येक शिक्षकाच्या नावाने वेगवेगळ्या झाडांचे वृक्षारोपण केले यामध्ये वड पिंपळ,बॉटल पाम,फणस,पेरू, मोरपंखी,अशोका,अंजीर,सीताफळ व जास्त प्रमाणात ऑक्सीजन देणारी विविध प्रकारची झाडे कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट विभागातील शिक्षक व काही उपस्थित विद्यार्थी दादा वाघमोडे,प्रणव कुमरे,ऋषिकेश वेदपाठक,राधा गायकवाड,साक्षी शिंदे या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन कोविड नियमावलीचे पालन करून वृक्षारोपण केले. त्यानंतर शिक्षक दिनानिमित्तचा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पी. एच.कदम,प्रमुख पाहुणे विभागाच्या प्रमुख प्रा.बोराटे मॅडम व कॉम्प्युटर व मॅनेजमेंट विभागाचे विभाग प्रमुख प्रा. लामकाने सर होते.तसेच कार्यक्रमासाठी विभागातील शेटे सर, दोशी सर, जाधव मॅडम,गायकवाड सर,इंगळे सर ,बळीप सर,राकेश कुलकर्णी सर,रुपेश कुलकर्णी सर,एच.एस.कुलकर्णी सर,आदी शिक्षक ऑनलाइन उपस्थित होते.या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व पटवून दिले.याप्रसंगी विभागातील शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
               या कार्यक्रमांमध्ये प्रा.बोराटे मॅडम यांनी करिअर विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रा. लामकाने सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन शिक्षक दिनाचे कौतूक केले.अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ पी एच कदम  यांनी विद्यार्थ्यांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण कल्पनेचे कौतुक केले व विद्यार्थ्यांनी प्रत्येक शिक्षकाच्या नावे लावलेले झाड जोपासण्याचे आश्वासन दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी शिंदे  तर आभार प्रदर्शन दादा वाघमोडे व यांनी केले.अशाप्रकारे केलेल्या कार्यक्रमाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक वर्ग व विद्यार्थीचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment