सन २०१६-१७ साली डिझेल दर प्रति लिटर ६० ते ७० रुपये होते. आज डिझेल ने शंभरी पार केली आहे. तरीही वाहतूकदर आणी तोडणी वाहतूक कमिशन तेव्हापासून जैसे थे असून कारखानदारांनी अद्याप कोणतीच दरवाढ केली नाही. शिवाय ऊस वाहतुक दारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असुन ते शासन दरबारी सुटावे अशी मागणी जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी केली असुन यासंदर्भात लवकरच राज्यव्यापी आंदोलन उभारले जाणार असल्याने या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली (यल्लमा देवीमंदीरासमोर )येथे उद्या रविवार दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीसाठी परिसरातील सर्व ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर व ट्रक मालकांनी सहभागी असे आवाहन खुपसे पाटील यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment