आज शुक्रवार रोजी जनशक्ती संघटना प्रदेश अध्यक्ष अतुल खुपसे - पाटील यांच्या उपस्थितीत ग्रा.पं कार्यालय सोनारी येथे बैठक संपन्न झाली. यावेळी अतुल खूपसे पाटील यांचा सोनारी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मी वडार महाराष्ट्राचा संघटना जि.अध्यक्ष अविनाश ईटकर, सोनारी चे सरपंच दीपक दुबळे, मी वडार महाराष्ट्राचा संघटना तालुका अध्यक्ष भास्कर इटकर, राम ईटकर, रोहन नाईकनवरे, राणा वाघमारे, मंगेश बारसकर, सोमनाथ आनवणे, अतुल जगताप, संतोष पवार, अण्णा दुबळे ,अतुल इटकर,गोकुळ इटकर, गुणाजी इटकर,चेतन शेलार, अशोक इटकर,किरण पवार,संतोष पवार,अजय इटकर,विजय इटकर,सोमा फले,लखन फले,सुनील इटकर,सावळाराम भोसले,काळू गायकवाड,अमर भोसले,सचिन सोनारीकर,सुमित दुबळे,पांडू वडेकर, सुधीर जाधव,महादेव काटवटे, विनोद नलवडे,समाधान जगताप,बाळू डोके यांच्यासह गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. या बैठकीदरम्यान संघटनेमार्फत गोरगरिबांचे प्रश्न कशाप्रकारे सोडवतो याची माहिती देण्यात आली तसेच संघटना वाढीसाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली यामध्ये जनशक्ती संघटना मराठवाडा सोशल मीडिया अध्यक्ष पदी सोनारी येथील राम ईटकर व आंदोरा येथील मंगेश बारसकर यांची सोशल मीडिया परंडा ता.उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सोनारी येथे झालेल्या बैठकीदरम्यान निवडीचे पत्र देऊन नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा जनशक्ती संघटना प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांच्या व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
तरुण युवकांनी जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून गावातील , तालुक्यातील, जिल्ह्यातील नागरिकांनच्या अडी अडचणी जाणुन घेऊन ते सोडविण्यासाठी प्रेयत्न करावेत जसे की विध्वा महीला, वयोवृद्ध नागरिक, अपंग यांना शासनाचा लाभ कसा देतायेईल याची माहिती दिली व काम करत असताना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास मी आहे. असे अतुल खुपसे पाटील यांनी बैठकी दरम्यान सांगितले.


No comments:
Post a Comment