Breaking

Tuesday, 7 September 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - बुद्रूकवाडी ता.माढा येथील प्रा.रामचंद्र शंकर जाधव यांना पी.एच.डी प्रदान.


बुद्रूकवाडी ता.माढा जि.सोलापूर येथील प्रा.रामचंद्र शंकर जाधव यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांनी सादर केलेल्या आधुनिक संतकवयित्री संतामाई निंभोरकर यांच्या वाड्मयाचा समग्र अभ्यास ह्या शोध प्रबंधासाठी नुकतीच पी.एच.डी ही सन्मानाची पदवी जाहीर केली,
पी.एच.डी साठी त्यांना डाॅ श्यामा घोणसे यांचे मार्गदर्शन लाभले. 
प्रा.रामचंद्र जाधव यांचे शालेय शिक्षण संजीवनी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मानेगाव येथे झाले.तर महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी विद्यालय बार्शी येथे झाले. वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेल्या सेट व नेट या दोन्ही परिक्षा ते यापूर्वीच उत्तीर्ण झाले आहेत.

शेतकरी कुटुंबात आर्थिक हाल अपेष्ठावर मात करीत जाधव यांनी शिक्षण क्षेत्रातील सन्मानाची पदवी मिळवल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जाधव हे लहाणपणापासून उत्तम प्रवचणकार आणी किर्तनकार असल्याने संत साहित्य हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय राहीला आहे.या आवडीतूनच त्यांनी संतामाई या अक्षरशत्रू असलेल्या संत कवयित्रीच्या दोन हजार अभंगावर आपला शोध प्रकल्प सादर केला. त्यांनी विविध साहित्य संमेलनातून सहभाग नोंदवला आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालिकात शोध निबंधही प्रकाशित झाले आहेत. चैतन्याचा अभंग, महामेरू,श्रीपाद बाबा, हा त्यांचा चरित्रगारंथही प्रकाशित झाला आहे. सुरूवातीला विनाअनुदानित महाविद्यालयात नोकरी केल्यानंतर गेल्या बारा वर्षापासून ते महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून चालविण्यात येत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शासकीय कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 

जाधव यांच्या यशाचे त्यांचे आई-वडील, मित्र मंडळी, ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. त्यांच्या यशासाठी डाॅ श्यामा घोणसे, डाॅ तुकाराम रोंगटे,डाॅ प्रभाकर देसाई,डाॅ सतिश बडवे,डाॅ प्रेमा लेकुरवाळे,डाॅ सुवर्णा गुंड, डाॅ राजेंद्र दास, डाॅ भारती खेडकर, यांनी अभिनंदन केले आहे. पुढील काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्याचा मानस असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment