Breaking

Tuesday, 7 September 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - केम टेंभूर्णी रस्त्याचे काम करा अन्यथा जनशक्ती संघटना रस्ता रोको करणार....संपर्क प्रमुख गणेश वायभासे.


केम टेंभुर्णी रस्त्याचे काम करा अन्यथा जनशक्ती संघटना रस्ता रोको करणार 
    गणेश वायभासे संपर्कप्रमुख 

टेंभुर्णी केम रस्ता बनला मृत्यूचा सापळा.

गेल्या दोन वर्षापूर्वी टेंभुर्णी रस्त्याचे काम झाले होते परंतु त्या रस्त्यांची अवस्था एका वर्षातच पूर्ण बदलून गेले रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे सध्या पावसाळा चालू असल्यामुळे रस्त्याचा वाहनधारकांना अंदाज येत नाही त्यामुळे बरेच अपघात घडत आहेत तसेच टेंभुर्णी ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे शेतकरी वर्ग आपला भाजीपाला दूध व दवाखान्याच्या कामासाठी त्या रोडचा वापर करत आहे त्या रस्त्याने जात असताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे या रस्त्याची दखल कोणच घेत नसल्यामुळे जनशक्ती शेतकरी संघटना व कनेरगाव दहिवली उपळवटे या ग्रामस्थांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कुर्डूवाडी यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनात सतरा 9 2019 चा अल्टिमेटम देण्यात आला आहे त्या वेळेत नाही काम झाले तर जनशक्ती व ग्रामस्थांच्यावतीने तेंभूर्णी एमआयडीसी चौक येथे जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रस्ता रोको करण्यात येणार आहे
सार्वजनिक बांधकाम विभाग कुर्डवाडी हेड गिरे रावसाहेब यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले त्यावेळी जनशक्ती शेतकरी संघटनेचे संपर्कप्रमुख गणेश वायभासे राणा महाराज वाघमारे दहिवली ग्रामपंचायत सदस्य महावीर  आबा जगताप. सोमनाथ कातुरे अवधूत आप्पा कदम भिकाजी जगताप अमोल नलावडे यशवंत पाटील बालाजी टोणपे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment