चांदणे वाडा भोसरे ग्रामपंचायत येथील हात पंप अखेर केला दुरूस्त-या भागातील नागरिकांना मुलभूत सुविधे पासून वंचित ठेवण्याचा प्रकार ग्रामपंचायत भोसरे ही नेहमीच करत आहे. 3 ते 4 महिन्यांपासून हात पंप बंद अवस्थेत होता. त्याचे अर्धवट काम रेंगाळत ठेवले होते. वारंवार ग्रामपंचायत भोसरे कार्यालयाकडे अर्ज करून सुद्धा पाण्याची समस्या सोडवण्यासाठी कुठल्याही उपाययोजना ग्रामपंचायत करत नाही. पंचायत समिती गटविकास अधिकारी साहेब यांच्या कडे ग्रामपंचायत भोसरे हात पंप दुरूस्ती करण्यासाठी करार करत नाही. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अमोल हावळे यांनी उपविभागीय अधिकारी कुर्डूवाडी कार्यालय माढा विभाग,जिल्हा परिषद मुख्य अधिकार सोलापूर यांचेकडे, जिल्हा अधिकारी कार्यालय सोलापूर,जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला. आज सर्व नागरिकांना पाणी मिळाले आहे. याकामी सर्व नागरिकांचे सहकार्य लाभले. यावेळी सचिन ताकतोडे,अझरुद्दीन मुलाणी, शाहरूख मुलाणी, निलेश ताकतोडे, अक्षय कसबे, सागर कसबे,संतोष ताकतोडे व अमोल हावळे यांनी विशेष प्रयत्न केले.
Wednesday, 25 August 2021
भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - भोसरे चांदणेवाड्यातील हातपंप अखेर केला दुरूस्त.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment