‘डोकं फोडून टाका’;
शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यापूर्वी पोलिसांना आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याचा व्हि.डि.ओ. व्हायरल......
भा.ज.पा.च्या एका बैठकीला विरोध करण्यासाठी जाताना एका महामार्गावरील वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटावर पोलिसांनी कथित लाठीमारात सुमारे १० जण जखमी झाले आहेत.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर व भा.ज.पा.चे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांच्यासह पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते या बैठकीत हजर होते.
राज्य पोलिसांच्या शेतकऱ्यांविरोधातील या कारवाईवर अनेकांनी टीका केली आणि तिच्या निषेधार्थ निरनिराळ्या ठिकाणी अनेक रस्ते रोखून धरण्यात आले होते.
दरम्यान, सोशल मीडियावर मे.कर्नालचे उप न्यायदंडाधिकारी आयुष सिन्हा यांचा एक व्हि.डि.ओ. व्हायरल होत आहे,
ज्यात ते पोलिसांना विरोध करणाऱ्यांचे डोके तोडण्यास सांगत आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हि.डी.ओ.मध्ये मे.उप न्यायदंडाधिकारी आयुष हे पोलिसांना शेतकऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे लेखी आदेशही देत आहेत.
आयुष अनेक पोलिसांसमोर उभा आहेत आणि त्यांना सूचना देत आहे की “हे अगदी स्पष्ट आहे,
तो कोणीही असो,
कुठलाही असो त्याला जाऊ देऊ नका.
येथून कोणालाही पुढे जाऊ देऊ नका.
आपली काठी उचला आणि जोरात मारा.
कोणत्याही सूचनांची आवश्यकता नाही,
फक्त जोरात मारायचे आहे.
जर मला इथे एकही आंदोलक दिसला तर त्याचे डोके फुटलेलं पाहिजे.
काही शंका आहे का ?
“पोलीस उत्तर देतात, ‘
नाही सर’.......”


No comments:
Post a Comment