Breaking

Thursday, 19 August 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त सर्व प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीया छायाचित्रकार प्रतिनिधी यांचा सत्कार संपन्न.




*जागतिक छायाचित्रकार दिना निमित्ताने सर्व प्रिंट मीडिया व इलेक्ट्रोनिक मीडिया छायाचित्रकार प्रतिनिधी यांचा सत्कार संपन्न*

*सोलापूर* :  19 ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो या अनुषंगाने जागतिक फोटोग्राफी व छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून गटनेते आनंद चंदनशिवे मंडई  व उद्यान सभापती गणेश पुजारी नगरसेविका ज्योती बमगोंडे  यांच्यावतीने तसेच जी एम मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते शहरातील सर्व प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया छायाचित्रकार प्रतिनिधी यांचा सत्कार  फेटा, गुलाब पुष्प व पेन ड्राइव्ह  देऊन करण्यात आला.
       याप्रसंगी बोलताना गटनेता आनंद चंदनशिवे  म्हणाले की एक आदर्श छायाचित्रकार त्याच्या चित्रीकरणातून एखादी घटना किती प्रभावी असते एखादी घटना किती नुकसान करत असते ही शक्ती किंवा ताकत छायाचित्रकारा च्या सादरीकरणात मध्ये असते अशा या सर्व छायाचित्रकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश पुजारी यांनी केले.    
       या कार्यक्रमास सत्कारमूर्ती म्हणून संदीप वाडेकर मिलिंद राऊळ  रामदास काटकर केवल तिवारी प्रमोद हिप्पर्गी आप्पा बनसोडे कृष्णकांत चव्हाण नितीन कटके आयुब कागदी  दिनेश शिंदे विनोद हुमनाबादकर अनिल कांबळे विशाल भांगे नितीन पत्रे दिनेश तावसेकर मनोज हुलसुरे सोमनाथ शिंदे विजय  आवटे आप्पा बनसोडे गणेश शिंदे राहुल रणदिवे विक्रांत कालेकर सचिन कुमार जाधव मकरंद ढोबळे  रोहन श्रीराम रजाक बेंगलोर तोसिफ शेख यासीन शेख लखन मिठ्ठा  संदीप काकडे यांचा प्रामुख्याने सत्कार करण्यात आला.
     या कार्यक्रम प्रसंगी ऍड.औदुंबर तीर्थकर हृदयनाथ मोकाशी संदेश इंगळे चंद्रकांत सोनवणे विनायक दत्तू यश कांबळे भीमा मस्के यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment