पंढरपूरातील कट्टर सावरकर भक्त,हिंदुमहासभेचे जेष्ठ नेते प्रकाशदादा उत्पात यांचे वृध्दापकाळाने दुख:द निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 81 वर्षे होेते.
हिंदुमहासभेच्या कार्याकरीता सुरक्षित असलेल्या शासकीय नोकरीचा राजीनामा देउन दादांनी हिंदुत्ववादी कार्यात झोकून दिले होते. प्रकाशदादांनी आयोध्येतील रामजन्मभुमी आंदोलन प्रसंगी झालेल्या कारसेवेत सक्रीय सहभाग घेतला होता.अत्यंत धाडसी निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी पंढरपूरात सावरकर प्रेमी मंडळाची स्थापना केली.त्यांचे वडील हे काँग्रेसचे नेते व म.गांधीचे अनुयायी होते मात्र प्रकाशदादांनी तरुण वयात सावरकरांची भाषणे व विचार ऐकून आयुष्यभर सावरकरांनी सांगितलेल्या हिंदुत्ववादाचा पुरस्कार केला.
अत्यंत धाडसी असणार्या प्रकशदादांनी पंढरीत त्या काळात गाजलेल्या मोठया गुंडाला धडा शिकविण्याची धाडसी कामगिरी त्यांनी केली होती.त्यामुळे खर्या अर्थाने ते दादा होते.पंढरपूरातील हिंदुत्वादी कार्यकत्यांना प्रोत्साहित करणे त्यांना कार्याकरीता प्रेरीत करण्याचे काम दादा कायम करीत असत.गेल्या काही दिवसापासून अल्पशा आजारामुळे त्यांचेवर अकलुज येथे उपचार चालु असतानाच त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,पंढरपूरात बजाज चे डिलर राहुल उत्पात,विवाहीत मुली सुना नातवंडे असा संपन्न परिवार आहे.


No comments:
Post a Comment