Breaking

Saturday, 21 August 2021

अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ - निवडणूक आयोगाने जिल्हाधिकार्यांना दिले,नगरपंचायत, नगरपरिषद निवडणूक तयारी संदर्भात प्रभाग रचना बनवण्याचे आदेश.


*निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी यांना दिले नगरपंचायत नगरपरिषद निवडणूक तयारी संदर्भात प्रभागरचना बनवण्याचे आदेश*

*श्रीपूर*
राज्यातील नगरपंचायत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक घेण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी यांना राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी आदेश दिले आहेत निवडणूका घेण्यासाठी प्रभागरचना तयार करून निवडणूका घेतल्या जातील अशा पध्दतीने तयारी करण्याची सुचना दिल्या आहेत त्यामुळे राज्यातील नगरपंचायत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे साधारण या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे  कोरोना पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण शांत होते  निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्ष नेते कार्यकर्ते निवडणूक तयारीत आहेत महाळुंग नगरपंचायत नातेपुते नगरपंचायत व अकलूज नगरपरिषद यांच्या निवडणुका माळशिरस तालुक्यात होणार आहेत  सदर निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे अकलूज नगरपरिषद होण्यासाठी अकलूजकर नेत्यांनी जनतेने मोठा संघर्ष केला आहे  निवडणूक नोव्हेंबर महिन्यात निश्चित होणार आहे त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले तर आश्चर्य वाटायला नको.

No comments:

Post a Comment