*माळेवाडी ( बोरगाव ) येथील प्रकरणात झालेल्या आरोपींना अटक करा. ÷ युवराज जगताप*
माळशिरस जि.सोलापूर मधील घटना : ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल होऊन सुद्धा आरोपी अटक नाही. 20/08/2021ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल होऊन सुद्धा आरोपी अटकेत नाहीत.
माळेवाडी ( बोरगाव ) येथील मातंग समाजातील माजी सरपंच यांच्या भावाचा रात्री मृत्यू झाला . सार्वजनिक स्मशानभूमी मध्ये मृतदेहाचा अंत्यविधी करण्यासाठी जाणारा रस्ता नियमातून नसल्यामुळे खाजगी शेतकऱ्याच्या शेत रस्त्यांमधून स्मशानभूमी कडे जावे लागत होते. या शेत मालकाचे आणि माजी सरपंचाचे अगोदरचे वाद असल्यामुळे शेतातून जाण्यास नकार दिला.त्यामुळे मयत व्यक्तीच्या घरातील मंडळींनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जाणारा रस्ता नसल्याने पोलिसांना कळविले . गावात ताण तणाव निर्माण झाला. शेवटी माळेवाडी बोरगाव ग्रामपंचायत कार्यालया समोर मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेहाचा अंत्यविधी केला. याबाबत रात्री उशिरा अकलूज पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल झाला आहे परंतु आरोपी आतापर्यंत अटक नाहीत आरोपी गावात राजरोसपणे फिरत असल्यामुळे पिडीत कुटुंबातील सदस्यांना धोका असल्याचे सांगितले आहे त्यामुळे लवकर कारवाई करून अटक करण्यात यावी. नाहीत राज्य भरात मातंग समाजाच्या वतीने आंदोलन काढण्यात येतील असे आवाहन मातंग एकता आंदोलन चे युवा अध्यक्ष युवराज भाऊ जगताप यांनी दिले.


No comments:
Post a Comment