प्रतिनिधी : माढा : बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली बहुजन युवा ब्रिगेडच्या माढा तालुका सचिव पदी योगेश किर्ते यांची निवड बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी केली.
बहुजन ब्रिगेड संघटनेच्या कामाचा झंझावात पाहून तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी बहुजन ब्रिगेड संघटना शासनस्तरावर ती करीत असलेल्या कामाची दखल घेऊन त्याच प्रमाणे संघटनेच्या कामाची पद्धत पाहून संघटनेच्या ध्येय धोरणाला अनुसरून या संघटनेच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या कामाला प्रेरित होऊन बहुजन प्रग्या संघटनांमध्ये सामील होत असल्याची योगेश किर्ते यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेश खरे सतत सक्रिय पद्धतीने काम करत असून सर्वसामान्यांच्या प्रश्नावर के आवाज उठवताना दिसतात त्यांना न्याय मिळवून देण्याची त्यांची प्रामाणिक भूमिका असल्याने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश खरे चांगले काम करीत असून त्याच्या बरोबरीने काम करण्याची इच्छा झाल्याने या संघटने मध्ये सामील झाल्याचे किर्ते यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित दलित महासंघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष नारायण गायकवाड, कुमार गायकवाड,तानाजी गायकवाड,शिवाजी शिंदे,व्युवा नेते पप्पू गायकवाड, गजानन शिंदे, दलित महासंघ तालुका अध्यक्ष सोमनाथ गायकवाड,प्रेम खरे,ज्ञानेश्वर शिंदे,सुशांत शिंदे


No comments:
Post a Comment