करकंब प्रतिनिधी/ संजय काळे - करकंब पोलिस स्टेशनच्या हद्दीतील व गावातील अवैद्य धंदे त्वरीत बंद करावेत....बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांची मागणी- याबाबत वृत्त असे की पंढरपूर तालुक्यातील मौजे करकंब गावात व करकंब पोलिस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर रित्या मटका, झुगार, दारू विक्री, खाजगी सावकारकी चालू असून या प्रकाराकडे करकंब पोलिस स्टेशनचे दुर्लक्ष असून गावात व पोलिस स्टेशन च्या हद्दीतील अवैद्य धंदे करणारे उघड धंदे करत असताना दिसत आहेत असे राजेश खरे यांनी पोलिस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पुढे ते निवेदनात असंही म्हणतात की खाजगीत बोलताना अवैद्य धंदे चालक करकंब पोलिस स्टेशनला हप्ते असल्याचे सांगत असून या मटका, झुगार, दारू विक्री, व खाजगी सावकारकी जोरात सुरू असून संबंधित अवैद्य धंदे चालक यांच्यावर तालुका बंदीची कारवाई करून त्यांना जिल्हातून तडीपार करावे अशी राजेश खरे यांची पोलिस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण यांना दिलेल्या निवेदनात मागणी आहे.
याप्रकरणी कारवाई जर नाही केली तर पोलिस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी पोलिस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.


No comments:
Post a Comment