Breaking

Friday, 30 July 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - कृष्णा- भिमा नदी जोड कालवा प्रकल्प मंजूर करून आपत्कालीन संकटातून मार्ग काढा.


कृष्णा-भीमा नदी जोड कालवा प्रकल्प मंजूर करून महापुराच्या आपत्कालीन संकटातून मार्ग काढा. प्रा सुहास पाटील. भिमानगर (प्रतिनिधी) -कृष्णा- भीमा नदी जोड कालवा प्रकल्प मंजूर करून कृष्णा नदीचे अतिरिक्त पाणी भीमा नदी उजनी धरण क्षेत्रात कालव्याद्वारे सोडले तर महापूराची आपत्ती रोखता येईल.याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रालयात रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा दिशा समितीचे सदस्य प्रा सुहास पाटील यांनी दिले आहे.या निवेदनामध्ये प्रा पाटील यांनी पुढील मागण्या केल्या आहेत.महाराष्ट्रात अनेक वेळा जास्त पावसामुळे महापुराची परिस्थिती निर्माण होते.जनतेला प्रचंड नुकसानीस व जीवित संकटाला सामोरे जावे लागत आहे.त्याच बरोबर शेती, घरेदारे, शासकीय इमारती, वाहने, क्रीडांगणे, रस्ते, पुल यांचे अतोनात नुकसान होत आहे.गेली चार वर्ष सातत्याने या महापूर आपत्तीला सातारा,सांगली व कोल्हापूर जिल्ह्यास  तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे केंद्र शासनाच्या नद्याजोड महत्वकांक्षी प्रकल्पामध्ये कृष्णा- भीमा नदी जोड कालवा प्रकल्पाचा समावेश करून महापूराची आपत्ती टाळता येईल. कृष्णा नदी क्षेत्रात जास्त पावसामुळे महापूराची परिस्थिती वारंवार जून व जुलै महिन्यात निर्माण होते.याचा फटका सातारा,सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांना बसत आहे.यासाठी कृष्णा नदीचे पुराचे अतिरिक्त पाणी भीमा नदीत कालव्याद्वारे उजनी धरण क्षेत्रात आणुन सोडावे.सध्या उजनी धरणाचा पाणीसाठा १२३ TMC असून फक्त ८६ TMC पाणी वापरात आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाण्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात असून धरणात पाणी उपलब्ध नसते.ऊजनी धरणातील मंजुर पाण्यापैकी २१ TMC पाणी मराठवाड्याला अद्याप द्यावयाचे बाकी आहे.तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक सिंचन योजना पाण्याअभावी रखडलेल्या आहेत. जर कृष्णा- भीमा नदी जोड कालवा मंजूर करून कृष्णेचे पाणी भीमा नदीत सोडले तर,उजनी धरणातील पाणी वाटपाचे योग्य नियोजन करता येईल.त्यामध्ये सोलापूर शहर पाणीपुरवठा,नवीन एमआयडीसी क्षेत्र, अक्कलकोट,दक्षिण सोलापूर, ऊत्तर सोलापूर, बार्शी, मंगळवेढा या तालुक्यांची प्रस्थापित मागणी मंजूर करता येईल. उजनी धरणातून सीना नदी वरील सर्व बंधारे अतिरिक्त पाण्याने भरून घेण्यात यावेत. अतिरिक्त वाहून जाणाऱ्या पाण्याचे योग्य ते नियोजन करून उजनी धरण क्षेत्रात पाऊस व पूर परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यातील सिंचन व्यवस्थेतील सर्व बंधारे,तलाव, शेततळे भरून घेण्यात यावीत. कृष्णा भीमा नदी जोड कालव्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था मजबूत होईल. भविष्यकाळात पाणी टंचाई राहणार नाही. त्यामुळे राज्य शासनाने कृष्णा- भीमा नदी जोड प्रकल्प मंजूर करून घेण्याविषयी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा.महापूराच्या आपत्तीकालीन संकटातुन जनतेला वाचवावे अशी मागणी प्रा सुहास पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. *चौकट*-कृष्णा-भिमा नदी जोड कालवा प्रकल्प मंजुर होणे अंत्यत आवश्यक आहे.याबाबतचा प्रस्ताव राज्यशासनाने केंद्राकडे पाठवावा.या प्रकल्प मंजुरीसाठी रयत क्रांती संघटना केंद्राकडे पाठपुरावा करीन.ही योजना मंजुर झाल्यास भविष्यकाळात पुर परिस्थिती नियंत्रणात राहील.आमदार सदाभाऊ खोत.माजी मंत्री व संस्थापक रयत क्रांती संघटना.

No comments:

Post a Comment