सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी मोहन कुंभार तर सचिवपदी सावता घाडगे - याबाबत वृत्त असे की मोडनिंब रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी मोहन कुंभार तर सचिवपदी सावता घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती सन 2021-2022 या वर्षाकरिता करण्यात आली असून नवीन संचालक मंडळ तयार करण्यात आले आहे. गेल्या 11 वर्षांपासून मोडनिंब रोटरी क्लब चे मोडनिंब व परिसरासाठी उत्तम प्रकारे कार्य चालू आहे. व ते अधिकाधिक चांगले करण्याचा प्रयत्न करू असे VBP NEWS सोबत बोलताना अध्यक्ष मोहन कुंभार व सचिव सावता घाडगे यांनी सांगितले. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, शेती,पर्यावरण, विविध क्षेत्रात समाजातील उपेक्षित लोकांना मदतीचा हात देण्यात रोटरी क्लब नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. हेच कार्य आपण आपल्या सर्व सहकार्यांसह पुढे अविरतपणे चालू ठेवणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहन कुंभार व सचिव सावता घाडगे यांनी सांगितले. त्याचबरोबर पदग्रहण सोहळा लवकरच घेण्यात येणार आहे. यावेळी रोटरीच्या माजी अध्यक्षा सौ.निशिगंधा माळी, डाॅ.संतोष दळवी, डाॅ. अनिल गोळवलकर, डाॅ. सुहास खडके, डाॅ. शशिकांत वागज, सुनिल पुरवत,सुनिल रेपाळ,दिपक सुर्वे, माजी अध्यक्ष बाळकृष्ण व्यवहारे, माजी सचिव मारूती वाघ, यांच्यासह सर्व रोटरीयन उपस्थित होते.
Friday, 30 July 2021
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी मोहन कुंभार तर सचिवपदी सावता घाडगे यांची नियुक्ती.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी मोहन कुंभार तर सचिवपदी सावता घाडगे यांची नियुक्ती.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment