*माढा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अवकाळी पावसाने महापुर अालेल्या पूरग्रस्तांसाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणुन चिपळूण या भागांसाठी माढा तालुका राष्ट्रवादीच्या सर्व युवक वर्गाच्या परिश्रमातून अनेक राष्ट्रवादी प्रेमी कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून तालुक्याचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य रणजीत भैय्या शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी बॉटल 400 बॉक्स, तीन टन अाटा ,100 बॉक्स पार्ले बिस्कीट,मेडिकल किट, तांदूळ एक टन ,गहू 1 टन ,चटई 100 नग ,ब्लॅंकेट 100 नग ,5000 मास्क ,सॅनिटायझर बॉटल 500, इत्यादी साहित्य लोक सहकार्यातून जमा करून अायसीअार टेंपो मालाने भरुन आज दिनांक 28/ 7/ 21 रोजी संध्याकाळी सात वाजता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी गोटू पाटील शहराध्यक्ष मयूर काळे यांच्या यांच्या पुढाकाराने चिपळूणला रवाना झाला जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या म्हणीप्रमाणे अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे महापूर येऊन अनेक कुटुंब बेघर होऊन अत्यंत गंभीर परिस्थिती चीपळून या भागांमध्ये झालेली असून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतु मनामध्ये बाळगून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील शहराध्यक्ष मयूर काळे यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रवादी प्रेमीना आव्हान करून अडचणीत असलेल्या चीपळून भागातील आपल्या बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी एक दिवसांमध्ये एवढे सगळे साहित्य जमा करून वेळेत आपल्या अडचणीतील बांधवांना देण्यासाठी रवाना झालेली आहे सोलापूर जिल्हा मधून फक्त माढा तालुक्यातील युवक राष्ट्रवादीने मदतीसाठी साहित्य जमा करून जलद गतीने मदत पाठवणारा पहिला माढा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आयसीआर टेम्पो जलद गतीने चिपळून ला रवाना झाला आहे वेळेला वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही असं म्हणतात त्याप्रमाणे अडचणीत असलेला माझ्या बांधवांसाठी भगिनींसाठी माता पित्यासाठी लहान पोरांसाठी माढा तालुका राष्ट्रवादी युवक चे सर्व पदाधिकारी, शहराध्यक्ष ,उपाध्यक्ष, सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष , विद्यार्थी संघटनेतील सर्व पदाधिकारी या सर्वांनी अहोरात्र कष्ट घेऊन स्वतः मदत करून मदतीचा हात पुढे केला आहे अनुभवाने आपण शिकतो कर्माने आपण मोठे होतो माणुसकीने माणूसपण जपतो प्रेमाने जग जिंकतो पण चांगल्या कर्तृत्वाने जगाच्या कायम लक्षात राहतो हा सद विचार मनाशी बाळगून स्वर्गीय बापूंचे विचार त्यांनी घालून दिलेला आदर्श या तत्त्वाशी बांधील राहून आज आत्ता लगेच ताबडतोब याप्रमाणे तालुका युवक राष्ट्रवादीची संपूर्ण टिम कामाला लावून आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ती संभाजी पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मदतीसाठी अतिशय परिश्रम घेतले राजाला प्रजा म्हणते पण बुद्धीवंताला सारी दुनिया मानते पद महत्वाचे नसते आपल्या विचारांची गुणवत्ता महत्त्वाची असते ही विचारांची गुणवत्ता सार्थ ठरवत राष्ट्रवादी युवक काँग्रेस माढा .तालुका अध्यक्ष संभाजी पाटील ,शहराध्यक्ष मयूर काळे ,तालुका उपाध्यक्ष रामभाऊ नवले ,तालुका तालुका ओबीसी सेल कार्याध्यक्ष अनिल शेठ तोडकर ,ओबीसी सेलचे तालुका उपाध्यक्ष अतुल कासवेद, तालुका युवक उपाध्यक्ष अध्यक्ष संजय मिस्कीन ,रविंद्र बेंद्रे टेंभुर्णी शहराध्यक्ष विद्यार्थी संघटना, राष्ट्रवादी पदवीधर संघटना तालुका उपाध्यक्ष सज्जन पाटील वरवडे ,समीर मुलानी राष्ट्रवादी तालुका सदस्य अल्पसंख्यांक संघटना, या सर्व संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन अडचणीत असलेल्या समस्त बांधवांना मदत करण्यासाठी गेलेले आहेत सुंदर आयुष्य सहज घडत नसतं तर ते* *जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे माणुसकी तून त्यागातून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या कृतीतून घडवावं लागतं आपल्या कृतीतून आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मदतीचा हात देत सर्वच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या कृतीतून चांगलं कार्य केलेल आहे या उज्वल कार्यासाठी समस्त ग्रामस्थ अकोले खुर्द यांच्या वतीने आपल्या सर्व टीमला मनस्वी धन्यवाद देतो*
*शब्दांकन महादेव घाडगे माजी सरपंच अकोले खुर्द*


No comments:
Post a Comment