Breaking

Tuesday, 29 June 2021

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - विनाकारण रस्त्यावर फिरणार्या वाहन धारकांवरती कारवाई सुरूच.


विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या वाहन धारकांवर अध्याप कारवाई सुरूच आहे. जप्त केलेली वाहने ७ दिवसानंतर परत घेण्यासाठी आलेल्या ९६ जणांची आजमध्ये अँण्टीजन चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७ जण कोरोना पॉझिटिव आढळले. त्यांना महापालीकेच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आलं. या सर्वांना अलगीकरण कक्षात पाठवण्यात आलय.

      - कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पोलिस, महापालिका आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. विनाकारण कोणीही रस्त्यावर येऊ नये यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही अनेक जण वाहनासह रस्त्यावर येत आहेत. अशा वाहनधारकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह शहरातील पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांद्वारे वाहन जप्तीसह दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जप्त केलेली वाहने ७ दिवसानंतर वाहतूक नियंत्रण शाखेकडून परत केली जात आहेत. मात्र वाहनधारकांना अँण्टीजेन चाचणी केल्याखेरीज वाहन ताब्यात दिली जात नसल्यामुळ अनेक वाहनधारकांचा नाईलाज झाला आहे. कारण आता शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयातच अँण्टीजेन चाचणी घेतली जात आहे. आज दिवसभरात ९६ वाहनधारकांनी आपली वाहन परत घेण्यासाठी ट्रॅफिक ब्रँच समोर गर्दी केली होती. या सर्व वाहनधारकांची
अँण्टीजेन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या सर्वांना महापालिकेच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आलय. त्यांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment