Breaking

Wednesday, 2 June 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - सदाभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा..प्रा.सुहास पाटील.


*सदाभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिनाचे मनोगत* शेतकरी,कष्टकरी व सर्व सामान्यांचे नेतृत्व,माझे राजकारणातील प्रेरणास्त्रोत,राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोतसोा यांचा वाढदिवस....भाऊं,आपली ओळखच शेतकर्‍यांचा नेता म्हणून होत असताना, सोलापूर जिल्ह्यातील ऊस ऊत्पादक शेतकर्‍यांना ऊस दर मिळवुन देण्याकामी आपण घेतलेला पुढाकार,शेतकरी व कष्टकरी,सामान्य लोकांच्या प्रश्नांसंबधीचा आपला ध्यास हाच आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला.शेतकरी चळवळीपासुन ते आज एका चळवळीचा संस्थापक अध्यक्षाची जबाबदारी पेलवत असताना,आपणास मंत्री पद मिळाले.आपले मंत्रीपद आपण एक शेतकर्‍याचा मुलगा आहोत,आपल्या मंत्रीपदाचा ऊपयोग शेतकर्‍यांसाठीच झाला पाहीजे हाच ऊद्देश मनात ठेवुन,महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्रिमंडळामध्ये एक ऊत्तुंग ठसा ऊमटवला.आपण मंत्रिपदावर असताना,गोरगरीब कुटूंबांची सेवा करणे हा भाव मनात ठेवला होता.भाऊ,त्याचाच फायदा घेत,मी माढा विधान सभा मतदारसंघात व सोलापूर जिल्ह्यात गोरगरीब रूग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन ४ कोटी ८० लाख रूपयांची मदत मिळवून दिली.मी भाऊ मुंबईला आपणांकडे आलो असता,भेट झाली की,सर,आज किती रूग्णांच्या फाईल आणल्यात,त्या अगोदर जमा करा व बाकीची कामे आपण नंतर बघुयात,असे म्हणायचे,याचे कारण सकाळी फाईल जमा केल्या की,दुपारी त्या फाईलवर कव्हर्रिंग लेटर लावुन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात पंकजमार्फत जमा करायचा व पुढील आठवड्यात मंजुरी घेऊन हातात निधीचे पत्र मिळायचे.अभिमान वाटतो,भाऊ,मी तुमच्याबरोबर राहुन गोरगरीब कुटूंबांची सेवा करण्याची संधी मिळाली.तुमच्यामुळे विकास कामे तर केलीच.पण माझ्या आयुष्यातील एकमेव अनमोल ठेवा आहे,तो,मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन गोरगरीबांना,शेतकर्‍यांना मदत मिळवुन दिल्याचा.लहान बाळांची ह्रदयाची आॅप्रेशन मोफत,मुंबईतील फोर्टीस हाॅस्पीटल,टाटा हाॅस्पीटल,केईएम आॅस्पीटलमध्ये यशस्वी करून दिली. या रूग्णांचा आर्शिवाद आपल्यासोबत रहाणार आहेतच. आजच्या दिनी आदिनाथ,सचिन,शुभम,किरण,सुजित,सचिन,भाऊंसोबतचे सर्व पोलीस मित्र,भाऊंचे आॅफीसचे सर्व विभागांचे ओएसडी, यांचीही आठवण झाली.आपणांमुळे भाऊ,तालुक्याच्या राजकारणात आपल्या शिलेदारांची व्यक्तीमत्वे ऊभी राहीलीत.त्यांची आस्तीत्व तयार होऊ घातलीत.आपल्या खतपाण्याने पुढे महाराष्ट्रात आपले शिलेदार राजकारणाच्या पटलावर यशस्वी भरारी घेतल्या शिवाय रहाणार नाहीत.भाऊ,गेली दिड वर्षे झाले,कोरोनाने सार्‍यांना ग्रासले असतानाही,आपण व्हिडीओ काॅनफर्रर्सिंग मिंटीगच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील संघटनेच्या पदाधिकार्‍यांसोबत शेतकरी प्रश्नाविषयी आवाज ऊठवला.आपल्या रयत क्रांती संघटनेचे ब्रिद वाक्य आहे,सुसंवादातुन संघर्षाकडे.हाच मनी ध्यास घेत कोरोनाकाळात देखील,*माझे अंगण हेच आंदोलनाचे रणांगण* हे घोषवाक्य घेऊन महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण रयत क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन केले व महाराष्ट्रभर आपल्या चळवळीतील सर्व सवंगड्यांना बरोबर घेऊन यशस्वी केले.म्हणजे भाऊ,तुंम्ही शेतकर्‍यांच्या प्रश्नापासुन कधीही बाजुला हटला नाही.हीच आपली आवड आंम्हा सर्व चळवळीतील संवगड्यांना लागली आहे.गोरगरीब,कष्टकरी,शेतकर्‍यांचे प्रश्न जाणुन घेवुन मार्गी लावण्याचा प्रयत्न करतायेत.भाऊ,आपण केलेल्या कामाची पोचपावतीपण सर्वांना दिलेली आहेच.भाऊ,पुढील भविष्य,तुमचे चळवळीतील सवंगडी तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत आगेकुच करीत रहातील.भाऊं,आज आपला वाढदिवस,हा वाढदिवस बहुतेक शाळेच्या तारखेचाच असावा..कारण आंण्णासोबत सहवास लाभला व आईसाहेबांसोबतही लाभतोय.आपला जन्मदिवस शाळेची तातीखच असावी,कारण आंण्णा व आंईंना जन्मदिन आठवण्यासाठी तारीख अंदाजे सणसुद व पंचागातील अंदाजे दिवसच असावा.असो,  घरातील आपल्या कुटूंबियांसोबत मरळनाथपुर या एका लहान खेड्यातुन चालु  झालेला आपला प्रवास..संपूर्ण महाराष्ट्रासाठी नवा नाही.फक्त आणी फक्त शेतकरी प्रश्नांची सोडवणुक करीत रहायचे.बरोबरच्या शिलेदारांचे प्रश्न सोडवायचे,हे आपण मनोमन ठरवलेले आहेच. सुनिलदादा व सागरभाऊ कर्तबगार व जिगरबाज मुलांच्या सोबत आपण पुढील काळ शैक्षणीक पिढ्या घडवण्यात घालवणार आहात.याचाही आंम्हाला अभिमान वाटतो.भाऊ,पुढील भविष्यकाळात आपण केलेली कामे,हीच आपल्या यशस्वी मार्गक्रमणात वाटचालीचा दगड ठरणार आहेत.भाऊ,आपणांसोबत काम करताना अभिमान वाटतो.शेतकर्‍यांच्या नेत्याचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना,आपल्यासोबत मनोगत व्यक्त करावेसे वाटले...आदरणीय सदाभाऊंना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...!!!! कळावे सदैव तुमचाच एक शिलेदार- प्रा सुहास पाटील.ऊजनी (माढा).जिल्हा संपर्कप्रमुख-रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा.९४२२४६३८५१

No comments:

Post a Comment