Breaking

Wednesday, 2 June 2021

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार- स्वयंपाकी शांतामामींनी दिली 50 हजारांची देणगी, आभाळा एवढं मन: निवृत्तीनंतरही जपली माणुसकी.


कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - स्वयंपाकी शांतामामींनी दिली 50 हजारांची देणगी, आभाळा एवढं मन: निवृत्तीनंतरही जपली माणुसकी-  याबाबत वृत्त असे की त्यांचे पूर्ण नाव शांताबाई मधुकर कांबळे परंतु येथील बालकल्याण संकुलाच्या त्या शांता मामी होत गेली तीस वर्ष बालकल्याण संकुलातील मुलांना त्यांनी आई सारखी माया दिली त्या सोमवारी निवृत्त झाल्या मिळालेल्या निवृत्ती वेतनातील रोख 50 हजार रुपये त्यांनी याच मुलांच्या देखभालीसाठी संस्थेला दिले व दानत माणसाच्या खिशात नव्हे तर हृदयात असावी लागते. याचेच प्रत्यंतर आणून दिले संस्थेतील सर्व मुलांसाठी त्यांनी आज बुधवारी खास जेवण देखील ठेवले आहे. बालकल्याण मधील शां. पंत वालावलकर कन्या निरिक्षण बालगृहात शांतामामी स्वयंपाकीचे काम करत होत्या. त्या मूळच्या सौंदलग्याच्या. त्यांचे पती मधुकर कांबळे हेदेखील संस्थेचे कर्मचारी होत त्यांचे दोनच वर्षापूर्वी निधन झाले शांत मामी ह्या गेली 25 वर्षे झाली सेवेत होत्या. प्रारंभी अनेक वर्ष महिना शंभर रुपये पगारावर त्यांनी नोकरी केली आताही त्यांना पेन्शन नाही त्यामुळे मिळालेल्या पैसे तुमच्यासाठी ठेवा असा आग्रह संस्थेचा मानद कार्यवाह प्रज्ञा तिवले यांनी धरला होता परंतु त्यांनी निवृत्ती समारंभात मदतीची घोषणा करून लगेच रोख पैसे संस्थेच्या स्वाधीन केले त्या संस्थेतील पडेल ते काम करायच्या मुलांना सकस आहार मिळावा यासाठी त्या धडपडायच्या त्यांच्या नोकरीला वेळेचे बंधन नव्हते असे कर्मचारी लाभले म्हणूनच ही संस्था मायेचे घर बनली निवृत्तीनिमित्त त्यांचा संस्थेतर्फे सत्कार झाला कन्या निरीक्षण गृहाच्या अधिक्षिका अश्विनी गुजर यांनी प्रास्ताविक केले. स्मिता वायचळ, टी.एम.कदम, सचिन माने, द्रौपदी पाटील यांची भाषणे झाली. अधीक्षक पी.के. डवरी यांनी आभार मानले.









 स्वयंपाकी शांतामामींनी दिली 50 हजारांची देणगी, आभाळा एवढं मन: निवृत्तीनंतरही जपली माणुसकी-  याबाबत वृत्त असे की त्यांचे पूर्ण नाव शांताबाई मधुकर कांबळे परंतु येथील बालकल्याण संकुलाच्या त्या शांता मामी होत गेली तीस वर्ष बालकल्याण संकुलातील मुलांना त्यांनी आई सारखी माया दिली त्या सोमवारी निवृत्त झाल्या मिळालेल्या निवृत्ती वेतनातील रोख 50 हजार रुपये त्यांनी याच मुलांच्या देखभालीसाठी संस्थेला दिले व दानत माणसाच्या खिशात नव्हे तर हृदयात असावी लागते. याचेच प्रत्यंतर आणून दिले संस्थेतील सर्व मुलांसाठी त्यांनी आज बुधवारी खास जेवण देखील ठेवले आहे. बालकल्याण मधील शां. पंत वालावलकर कन्या निरिक्षण बालगृहात शांतामामी स्वयंपाकीचे काम करत होत्या. त्या मूळच्या सौंदलग्याच्या. त्यांचे पती मधुकर कांबळे हेदेखील संस्थेचे कर्मचारी होत त्यांचे दोनच वर्षापूर्वी निधन झाले शांत मामी ह्या गेली 25 वर्षे झाली सेवेत होत्या. प्रारंभी अनेक वर्ष महिना शंभर रुपये पगारावर त्यांनी नोकरी केली आताही त्यांना पेन्शन नाही त्यामुळे मिळालेल्या पैसे तुमच्यासाठी ठेवा असा आग्रह संस्थेचा मानद कार्यवाह प्रज्ञा तिवले यांनी धरला होता परंतु त्यांनी निवृत्ती समारंभात मदतीची घोषणा करून लगेच रोख पैसे संस्थेच्या स्वाधीन केले त्या संस्थेतील पडेल ते काम करायच्या मुलांना सकस आहार मिळावा यासाठी त्या धडपडायच्या त्यांच्या नोकरीला वेळेचे बंधन नव्हते असे कर्मचारी लाभले म्हणूनच ही संस्था मायेचे घर बनली निवृत्तीनिमित्त त्यांचा संस्थेतर्फे सत्कार झाला कन्या निरीक्षण गृहाच्या अधिक्षिका अश्विनी गुजर यांनी प्रास्ताविक केले. स्मिता वायचळ, टी.एम.कदम, सचिन माने, द्रौपदी पाटील यांची भाषणे झाली. अधीक्षक पी.के. डवरी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment