Breaking

Wednesday, 2 June 2021

संपादक/ संजय मामांनी पोलिसाला देखील बनवले मामा.


संजयमामांनी पोलीसाला देखील बनविले 'मामा'

* शेतकऱ्यांच्या परस्पर उचलले २२ कोटी ११ लाखांचे कर्ज 

* खत देतो म्हणून घेतली होती कागदपत्रे 






करमाळ विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव या कारखान्याने शेतकऱ्यांना सन २०१३ साली खत देतो म्हणून कागदपत्रे जमा केली. मात्र शेतकऱ्यांना खत न देता त्या कागदपत्रांचा गैरवापर करत पुणे, कोथरूड येथील पंजाब नॅशनल बँकेकडून शेतकऱ्यांच्या नावे तब्बल 22 कोटी 11 लाख रुपयांची रक्कम उचलल्याचे समोर आले असून याबाबत कारखान्याचे चेअरमन व कारखान्यावर कारवाई करावी व आम्हाला कर्जमुक्त करावे अशी मागणी रणजीत भोगा, अशोक भोगल, प्रदीप ढवळे या शेतकऱ्यांनी केली आहे विशेष म्हणजे शेतकरी अशोक भोगल हे पोलीस असून त्यांच्या नावावर देखील विठ्ठल कार्पोरेशन ने कर्ज उचलल्याने संजयमामांनी पोलीस असलेल्या शेतकऱ्याच्या नावावर परस्पर कर्ज उचलल्याने पोलिसाना देखील मामा बनवले चे बोलले जात आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की करमाळा तालुक्यातील शेतकरी रणजीत बोगा अशोक व प्रदीप ढवळे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांना मे महिन्यात पुणे येथील पंजाब नॅशनल बँक कोथरूड च्या कर्ज घेतलेल्या नोटीस आले आहेत.

दरम्यान या शेतकऱ्यांना विठठल कारपोरेशन म्हैसगांव यांनी 2013 मध्ये खत घेण्यासाठी म्हणून शेतकऱ्याच्या

नावाने दोन लाख रुपयेचा आसपास रक्कम उचलल्याचे नोटीस मध्ये म्हटले आहे. या शेतकऱ्यांनी कोणत्याच प्रकारे बॅंकेकडून कर्ज घेतले नसताना आलेली नोटीस पाहून शेतकरी चक्रावून गेले. याबाबत अधिक माहिती व चौकशी केली असता आमदार संजय मामा शिंदे यांच्या विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव येथील कारखाने 2013 साली सदरचे कर्ज उचलले असून शेतकऱ्यांच्या परस्पर या या कर्जाचे सन 2017 मध्ये रिनोवेशन केले आहे दरम्यान यानंतर डायरेक्ट शेतकऱ्यांना 29 मे 2019 रोजी नोटीस आली आहे.

शेतकऱ्यांच्या नावे उचलली एकुण रक्कम 22 कोटी 11 लाख रुपये असुन शेतकऱ्यांनवी आपआपल्या नावे असलेले कर्जे भरावे अन्यथा फौजदारी कारवाईचा इशारा बॅंकेने दिला आहे. 


दरम्यान करमाळ्याचे लोकप्रतिनिधी असलेल्या संजयमामा शिंदे यांनी ही शेतकऱ्यांची केलेली

फसवणुक आहे. त्यांनी त्वरीत आमचे न काढलेले कर्ज भरुन आम्हाला कायदेशीर कचाट्यातुन

वाचवावे, अन्यथा आमदार संजयमामा शिंदे यांच्या घरापुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय

राहणार नाही असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. 




चौकट १ 

झोपेत डोक्यामध्ये दगड घालण्याचा हा प्रकार

- शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने आपल्या जवळची कागदपत्रे कारखाना प्रशासन व चेअरमन ला दिलेली आहेत मात्र त्यांच्या परस्पर एवढा मोठा रखमा उचलून आमदार संजय मामा शिंदे यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात करत झोपेत असताना डोक्यामध्ये दगड घातलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत व त्यांची खाती पूर्ण रक्कम भरून नील करेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.



अतुल खुपसे पाटील

शेतकरी नेते


चौकट २

संजय शिंदेंच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करणार

- विठ्ठल कार्पोरेशन च्या नावे आमदार संजयमामा शिंदे यांनी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल शेतकर्यांच्या परस्पर केली आहे. संजयमामा शिंदे यांनी कोट्यवधी रुपयांचा जुगार खेळून जि.प. अध्यक्ष मिळविले, त्यानंतर लोकसभा लढविली आणि आज विधानसभा आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे एवढा पैसा आला कोठून असा आमचा सवाल आहे. शिवाय त्यांची ईडी चौकशी हवी अशी मागणी आम्ही करणार आहोत.


माऊली हळणवर 

शेतकरी नेते


No comments:

Post a Comment