Breaking

Monday, 14 June 2021

संपादक/ बनावट बोगस ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करा अन्यथा जबाबदार अधिकार्यांना बेशरमाची फुले देणार...जनशक्ती संघटनेचा इशारा.


बनावट व बोगस ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करा अन्यथा जबाबदार अधिका-यांना बेशरमाची फुले देणार - 
जनशक्ती संघटनेचा ईशारा 



औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व अनियमितता करुन भ्रष्टाचार केलेला आहे.बनावट व बोगस वर्कडन आणि वर्क ईन हॅड तयार करुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई यांच्याकडून ठेकेदार नोदणी करुन दिली जाते याबाबत जनशक्ती संघटनेचे रऊफ एन.पटेल यांनी सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई यांचेकडे दि.10 ऑक्टोंबर 2020 रोजी लेखी तक्रार केली होती त्यानुषंगाने चौकशी होऊन भगवान विलासराव आव्हाड यांनी ठेकेदार नोदणी प्रस्तावासोबत जोडलेले वर्क डन आणि वर्क ईन हॅड बोगस व बनावट तयार करुन लावल्याचे निदर्शनास आल्याने चौकशी समितीने प्रशासनाची फसवणूक केली म्हणून फौजदारी गुन्हा दाखल करुन काळ्या यादीत टाकून त्याचे शासनाच्या पोर्टलवरुन नाव कमी करण्याची शिफारश करुन या प्रकरणी कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करतांना कोणतीही खातरजमा न करता याकडे दुर्लक्ष केलेले आहे असा चौकशी समितीने चौकशी अहवालात अभिप्राय नोंदविला.
     दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पत्र दि.1/3/2021 अन्वये कार्यवाही करण्यास विलंब व दिरंगाई करत असल्याने मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद मध्ये रऊफ एन.पटेल यांनी फौजदारी याचिका क्रमांक 493/2021 दाखल करुन बनावट ठेकेदार विलास भगवानराव आव्हाड याच्यासह त्यास या प्रकरणी त्याला मदत करणारे कार्यकारी अभियंता अशोक घुगेसह जबाबदार असणा-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती त्यानुसार खंडपीठाने दि.7/6/2021 रोजी सुनावणी गेऊन संबंधित विभागाला चौकशी अहवालानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
     महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता प्रशांत भांमरे यांचकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील कारवाई केली जात नाही तसेच चौकशी अहवाल प्राप्त होऊन देखील अभिप्रायासह अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविण्यासाठी हेतु पुरस्कर दिरंगाई केली जात आहे.
      अशा प्रकारे सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद ठेकेदार नोंदणी प्रकरणी आपल्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचा-यांना वाचविण्याच्या हेतुने बोगस व बनावट ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याबाबत दिरंगाई करत आहे.म्हणून रऊफ एन.पटेल यांनी मुख्यमंत्री,मुख्य सचिव,अप्परमुख्य सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,विभागीय आयुक्त,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांना ईमेलव्दारे निवेदन पाठवून येत्या 15 दिवसात बनावट ठेकेदार भगवान आव्हाड व त्यास याकामी मदत करणारे कार्यकारी अभियंता अशोक घुगेसह जबाबदार अधिकारी व कर्मचा-यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन कार्यवाही अन्यथा 15 दिवसानंतर कारवाई न केल्यास सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बेशरमाची फुलं देऊन दिरंगाईबाबत निषेध नोंदविण्यात येईल अशा ईशारा जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य च्या औरंगाबाद च्या वतीने देण्यात आला आहे.
   या आंदोलनावेळी जनशक्ती संघटनेचे औरंगाबाद पदाधिकारी प्रभाकर बापू भुसारे,अनिल पाटील शेळके,बाबुराव मोरे,प्रभाकर शेजुळ,संतोष धाडगे,उस्मान शहा, जावेद शेख,युवराज बोरसे ,सुनिल रोठे,अमोल   मगर,रवी भोसले शेख नसीर ,बंडू बोबडे,संतोष शेजुळ ,ज्ञानेश्वर काकडे,संतोष कोळगे आदींची उपस्थिती राहणार आहे.

No comments:

Post a Comment