*मरवडे येथे 43 मृतांना गावकऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली*
*श्रद्धांजली सभा संपन्न*
*गावमातीतल्या जिवाभावाच्या 43 मृत सहकाऱ्यांना मरवडेकरांनी जड अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण केली. या शोकसभेत मृत व्यक्तींच्या आठवणीने अनेकांना गहिवरुन आले....तर कित्येकांना गलबलून आले* !
मरवडे येथील छत्रपती परिवार व ग्रामस्थांच्या वतीने गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत कोरोना तसेच वृद्धापकाळामुळे 25 पुरुष व 18 महिला अशा *एकूण 43 नागरिकांचे निधन झाले* असून या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली. *एकाच डिजिटल होर्डिंग्जवर मयत झालेल्या सर्वांचे एकत्र फोटो पाहून अनेकांच्या आठवणींचा बांध फुटला*.
सुख दुखाःच्या प्रसंगात नेहमीच परस्परांच्या संपर्कात असणाऱ्या अनेकांना या काळात अशा दुखःद प्रसंगात देखील दूर रहावे लागले. माणुसकीची परीक्षा बघणाऱ्या या काळातून बाहेर पडताच *मरवडे ग्रामस्थांनी शोकसभेच्या माध्यमातून आपल्या सहवेदना व्यक्त केल्या*.
यावेळी छत्रपती परिवाराचे संस्थापक *सुरेश पवार, माजी सभापती भारत मासाळ, अंबादास पवार , प्राचार्य राजेंद्र पोतदार, हैदर केंगार, प्रा. बाळासाहेब भगरे, राजाराम कालिबाग, माजी उपसरपंच हणमंतराव शिवशरण, गोविंदराव चौधरी, दत्तात्रय वाघ ,माणिकराव पवार, गोविंदराव मासाळ, मेजर प्रल्हाद शिंदे, प्रहारचे युवा जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष पवार , मेजर कुंडलिक गणपाटील यांनी अनेक मृत व्यक्तींच्या आठवणी जागवल्या. यावेळी राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने मृत कुटुंबातील गरजूंना जीवनावश्यक किराणा वस्तूंचे कीट मदतीच्या स्वरुपात देण्याचा मनोदय हणमंतराव दुधाळ यांनी व्यक्त केला*.
यावेळी माजी *जि.प.सदस्य व्यंकटराव भालके*, उद्योगपती *हणमंतराव दुधाळ, सोसायटीचे चेअरमन आण्णासाहेब पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी केंगार, पोलिस पाटील महेश पवार* , *मरवडे गावचे माजी सरपंच सर्वश्री* अशोकराव पवार, अजितसिंह पवार, महादेव मासाळ, दादासाहेब पवार, किसन रोंगे, शिवाजीराव पवार, बाळासाहेब बनसोडे, रतिलाल केंगार यांच्यासह *मरवडे ग्रामपंचायत सदस्य* अशोकराव जाधव,संजय पवार,समाधान ऐवले , अमीर मणेरी हे उपस्थित होते. याशिवाय उद्योजक बसवराज येडसे, भिमराज प्रतिष्ठानचे संस्थापक मेजर राहुल शिंदे,अमोल घुले, अल्लाबक्ष इनामदार, द्यानदेव बनसोडे, दत्तात्रय जगताप,शिवक्रांती ग्रुपचे रविंद्र शेणवे,दत्तात्रय जाधव, गिरीधर शिवशरण, इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सभेची सुरुवात *गायक आदिती व जय कदम या भावंडाच्या भक्ती गीतांनी झाली*. प्रास्ताविक बाळासाहेब कदम यांनी केले तर सूत्रसंचालन माजी उपसरपंच विजय पवार यांनी केले. यावेळी मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.पुष्पवृष्टी करुन मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. *या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली*. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय मासाळ , सुधीर पवार , अरुण सरडे, नितीन निकम, विठ्ठल सुर्यवंशी,अजित गायकवाड, संजय काले , जहांगीर मुजावर, बापू लोहार, अजिंक्य माने, पराग रोंगे, दत्तात्रय कालिबाग,सागर पवार यांच्यासह छत्रपती परिवाराच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
*यावेळी मयत व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्य तसेच मरवडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते*. बाहेरगावी वास्तव्य करीत असलेल्या अनेक मरवडेकरांनी गुगल मिट लिंक द्वारे सहभाग नोंदवला.


No comments:
Post a Comment