Breaking

Friday, 14 May 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - उजनी धरणातून इंदापूरला नेण्यात आलेल्या पाच टीएमसी पाण्यासंदर्भात सोलापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकार्यांची दि.16/5/2021 रोजी सोलापूर शासकीय विश्रामगृहात महत्वपूर्ण बैठक.



सोलापूर जिल्ह्याची  रक्तवाहिनी असलेल्या   उजनी धरणाचे ५ टी एम सी  पाणी  सांडपाण्याचा नावाखाली  उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी  उचलण्याची परवानगी नुकतीच महाराष्ट्र शासनाने दिली आहे  सगळीकडे कोरोनाचे वातावरण असल्यामुळे,  या विरोधात कुठलीही आंदोलने होऊ शकत नाहीत  जर कोरोना नसता  तर जनसामान्य जनतेने खूप मोठी आंदोलने उभा केली असती.
    आता प्रत्येक जण  आपल्या आपल्या परीने पत्रक काढून किंवा पत्रकार परिषदा घेऊन  जनतेच्या दबावामुळे  पाणी उचलण्यास विरोध करण्याची भूमिका जाहीर करत आहेत  काही सामाजिक संस्थेनी व  शेतकरी संघटनांनी  या बाबतीत आवाज उठवायला सुरू केला त्यानुसार जलसमाधी उपोषणे   अशी आंदोलने ते करत आहेत  त्यांच्याशी प्रशासनाने चर्चा करण्याचा नुकताच  फार्स  केलेला आहे  त्यातून काही ठोस पर्याय निघेल असे वाटत नाही.







    मागील पंधरा वीस दिवसातील  विविध पत्रके आंदोलने  याचा सारांश बघता असे करून आपले जाणारे पाणी थांबणार नाही  त्यासाठी  राजकारण बाजूला ठेवून  सर्वांनी एकत्रितपणे येऊन  ठोस अशी दिशा ठरवली तरच  आपण पाणी वाचवू शकणार आहे  यापूर्वी आपण सगळे शांत बसल्यामुळे  मराठवाड्यासाठी सुद्धा पाणी गेलेलेच आहे  आणि आता जर ५ टी एम सी पाणी आपण वाचवू शकलो नाही तर पुढील पिढी आपणास माफ करणार नाही.






  या सर्वांचा  विचार करून  मी व  करमाळा तालुक्याचे माजी आमदार  नारायण (आबा) पाटील  दोघांनी असा विचार केला की आपण सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय    लोकप्रतिनिधींना एकत्र येण्याची विनंती करून  सर्वांनी एकत्र बसून विचारविनिमय करून  पाणी वाचवण्यासाठी काय काय करावे लागेल याची चर्चा करावी   व चर्चेनुसार  काही मार्ग ठरवता येतो का  हे ठरवण्यासाठी  बैठक घेण्यासाठी पुढाकार घेऊ त्यासाठी आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतली आहे.







  रविवार दिनांक  १६ /५/ २०२१ रोजी दुपारी १ वाजता  शासकीय विश्रामगृह सोलापूर  या ठिकाणी बैठक  घेण्याचे प्रयोजन आहे  त्यानुसार आम्ही सर्वांशी संपर्क करणार आहोत.







     आमची सर्वपक्षीय  लोकप्रतिनिधींना विनंती आहे  की आपण  सर्वांनी पक्ष,संघटना, जातपात, सर्व बाजुला ठेवल्याशिवाय  एकत्रितपणे ठोस लढा दिल्याशिवाय  आपण उजनीचे पाणी वाचवू शकणार नाही  त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की  आपण वरील ठिकाणी वरील दिवशी  उपस्थित राहून  आपले बहुमोल असे मार्गदर्शन  करावे  म्हणजे पुढील  दिशा ठरवण्यासाठी त्यातून काहीतरी मार्ग निघेल, 






   सर्व लोकप्रतिनिधींना  विनंती आहे की  बैठकीच्या स्थानी फक्त लोकप्रतिनिधीच असतील याची काळजी घ्यायचे ठरवले आहे  त्यामुळे आपणही आपल्याबरोबर  कुठल्याच  कार्यकर्त्याला आणले नाही तर खूपच बरे होईल  
   बैठकीमध्ये  कोरोनाचे सर्व नियम  पाळूनच बैठक घ्यावयाची आहे.





  
        तरी सर्व आदरणीय लोकप्रतिनिधींना विनंती आहे की  आपण कृपया या बैठकीस यावे ही नम्र व आग्रहाची विनंती  
कळावे आपला  


नारायण (आबा) पाटील  
माजी आमदार करमाळा 


 
   संजय (बाबा) कोकाटे
शिवसेना माढा विधानसभा मतदारसंघ

No comments:

Post a Comment