बहुजन ब्रिगेड,भाजप,मनसे,युवा सेनेची करकंब येथील जगताप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वर कारवाई करण्याची मागणी-
: बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करकंब तालुका पंढरपूर येथील जगताप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.सदर प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे लक्ष्मण वंजारी,मनसेचे महेंद्र पवार,युवा सेनेचे रणजित कदम,यांनीही तक्रारी निवेदन दिले आहे.
बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की,सदर हॉस्पिटल मध्ये सेवा देणारे डॉक्टर जगताप हे एम डी आयुर्वेद अशी पदवी धारण केली असताना ते अलोपॅथिकव कोविड १९ चे उपचार करीत आहेत,हे उपचार करीत असताना कोणतेही तज्ञ डॉक्टर,फिजिशियन,डॉक्टर इतर वैद्यकीय कर्मचारी,नसताना अशिक्षित दोन कामगारांच्या मदतीने कोविड १९ रुग्णावर उपचार केल्याने अनेकांचे जीव गेले आहेत असे निवेदनात म्हटले आहे.
जगताप रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णाकडून अवाजवी बिल आकारण्यात येत असून,या रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णाकडून घेतलेल्या बिलाची चौकशी करण्यात यावी,आणि रुग्णाच्या मृत्यू ला जबाबदार असलेल्या डॉक्टर वरती मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करून या हॉस्पिटल ची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी सोलापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बहुजन ब्रिगेड,भाजप,मनसे,युवा सेनेची करकंब येथील जगताप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वर कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी : करकंब : बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करकंब तालुका पंढरपूर येथील जगताप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.सदर प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे लक्ष्मण वंजारी,मनसेचे महेंद्र पवार,युवा सेनेचे रणजित कदम,यांनीही तक्रारी निवेदन दिले आहे.
बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की,सदर हॉस्पिटल मध्ये सेवा देणारे डॉक्टर जगताप हे एम डी आयुर्वेद अशी पदवी धारण केली असताना ते अलोपॅथिकव कोविड १९ चे उपचार करीत आहेत,हे उपचार करीत असताना कोणतेही तज्ञ डॉक्टर,फिजिशियन,डॉक्टर इतर वैद्यकीय कर्मचारी,नसताना अशिक्षित दोन कामगारांच्या मदतीने कोविड १९ रुग्णावर उपचार केल्याने अनेकांचे जीव गेले आहेत असे निवेदनात म्हटले आहे.
जगताप रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णाकडून अवाजवी बिल आकारण्यात येत असून,या रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णाकडून घेतलेल्या बिलाची चौकशी करण्यात यावी,आणि रुग्णाच्या मृत्यू ला जबाबदार असलेल्या डॉक्टर वरती मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करून या हॉस्पिटल ची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी सोलापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:
Post a Comment