टेंभूर्णी पोलिस ठान्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे साहेब यांनी मातंग समाजावर कायद्याचे भाण सोडून दमदाटी शिवीगाळ केल्याप्रकरणी कायदेशीर चौकशी करुण कायदेशीर कारवाई करण्याबाबत वंचित बहुजन आघाडी चे मोहोळ तालुका युवा अध्यक्ष महादेव गाडे यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन-
याबाबत अधिक माहिती अशी टेंभुर्णी शहरातील पोलीस ठाणे लगतच आण्णाभाऊ साठे नगर मातंग समाजाची राहिवाशी वस्ती आहे. त्यामुळे वाऱ्याने कचरा उडून पोलीस ठाण्यामध्ये जातो निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास वीस ते पंचवीस पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने महिला व लहान मुलांना राहत्या घरी जाऊन धक्काबुक्की करत घरातून बाहेर काढून आणले पोलीस स्टेशन आवारातील घाण तुम्हीच टाकलेली आहे. तुम्हीच उचला असे म्हणत महिला व लहान मुले यांना शिवीगाळ करून
त्यांना संपूर्ण कचरा घाण गटारी संडास माणसांची व जनावरांची विष्ठा हाताने उचलायला लावली महिलांनी कचरा साफ करण्यास नकार देताच पोलिस निरीक्षक केंद्रे यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी मातंग समाजातील महिलांना राहत्या आपल्या घरातून बोलावून जबरदस्तीने मानवी विष्ठा व जनावरांची विष्ठा
हाताने उचलायला लावली पोलिस स्टेशनचे कंपाउंड झाडून काढायला लावले 75 वर्षे वृद्ध कोरोनामुक्त महिलेसही दमबाजी करत शिवीगाळ केली. कोरोनामुळे पाचपेक्षा अधिक लोक एकत्रित न येण्यासाठी जिल्हाधिकार्यांचा आदेश असताना त्यांचे उल्लंघन केले या प्रकरणी राजकुमार केंद्रे व पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक काशीद, पोलीस कॉन्स्टेबल ढावरे, पोलीस कॉन्स्टेबल गुटाळ आधी पोलीस कर्मचाऱ्यांवर लवकरात लवकर कायदेशीर चौकशी करून अॅट्राॅसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करून निलंबित
करण्यात यावे व आपल्याकडून दलित समाजाला न्याय मिळावा हि नम्र विनंती आहे झालेल्या प्रकरणाची चौकशी व कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास आम्हाला उपोषणास बसावे लागेल याची नोंद घ्यावी असे या निवेदनात गाडे यांनी म्हटलं आहे व हे निवेदन त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना ईमेलद्वारे पाठवले आहे.


No comments:
Post a Comment