सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोफत धान्यापासून गोरगरीब वंचित....युवराज जगताप- याबाबत वृत्त असे की *मोफत धान्य कधी मिळणार ? गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ*
करमाळा÷ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मोफत रेशन धान्य देण्याचे आश्वासन जनतेला लाॅकडाऊन करताना घोषणा केली तरी अजून अन्नधान्य मिळाले नाही. एका महिन्या पासून लाॅकडाऊन असल्या कारणास्तव बहुजन समाज व गोरगरीब कामगार वर्ग कोठे ही कामाला जाऊ शकत नाही त्यामुळे गोरगरीब जनता व बहुजन समाज्यावर
उपासमारीची वेळ आली आहे.मोफतअन्न धान्य कधी मिळेल ? असा सवाल मातंग समाजाचे अध्यक्ष युवराज भाऊ जगताप यांनी मुख्यमंत्री साहेबांना ईमेल व्दारे केला. अन् लवकर व्यवस्थापन करा अशी विंनती केली आहे.
No comments:
Post a Comment