A*कोकणस्थ कुंभार समाज विकास संस्था पुणे संघटनेने " ऑनलाइन " पद्धतीने साजरी केली संत गोरोबाकाकांची ७०४ वी पुण्यतिथी*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दिनांक ९ मे २०२१ रोजी संत शिरोमणी गोरोबाकाकांची ७०४ व्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यासाठी समाजाचा राज्य स्तरीय "ऑनलाइन महाआरती " सोहळा नुकताच यशस्वीरित्या संपन्न झाला
सदर कार्यक्रमाचा शुभारंभ समाजाचे सन्माननीय अध्यक्ष कोकणरत्न श्री चंद्रकांतजी चिवेलकर साहेबांनी गोरोबाकाकांच्या प्रतिमेचे पूजनकरून केले नंतर समाजाच्या महिला प्रमुख गानकोकीळा सौ. सुरेखाताई साळवी यांच्या सूरेल अभंगाने कार्यक्रमाची सकाळी ठीक ११ वाजता सूरूवात झाली त्या वेळेस सर्व समाज बांधवांनी आपल्या घरातील गोरोबाकाकांच्या प्रतिमेचे पूजन केले व ऑनलाइन पद्धतीने महाआरती मध्ये सहभागी झाले.टाळ, मृदुंन्ग,
तबला ,सतार आणि सुमधूर शब्दांने गायलेल्या आरतीमध्ये सर्वांच्याच घरा घरातील वातावरण भक्तिमय झाले नाशिक , पुणे , कोल्हापूर , लातूर , बीड , उस्मानाबाद , बुलढाणा , ठाणे , रत्नागिरी , गुहागर , मळगाव , दापोली , दाभोळ , मुंबई , सांगली , सातारा , मिरज, कऱ्हाड येथून एकाच वेळी गोरोबकाकांच्या नामाचा जल्लोष समस्त कुंभार बांधवांच्या घरा घरात " महाआरती " च्या रूपात दूमदूमला समस्त कोव्हीड च्या सरकारी नियमांचे पालन करून सोहळा संपन्न झाला त्या नंतर समाजाचे सन्माननीय अध्यक्ष कोकणरत्न श्री चंद्रकांतजी चिवेलकर साहेबांनी समस्त समाज बांधवांना संबोधित केले त्यांनी या करोना काळामध्ये आपण सर्व
बांधव शरीराने जरी दूर असलो तरी मनाने जवळच आहोत असे सांगून करोनाच्या संकटा मध्ये आपण कशी काळजी घेतली पाहिजे त्याच बरोबर लसीकरणाचे महत्व सर्वांना समजावून सांगून उद्बोधीत केले या नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील ऑनलाईन उपस्थित समाज बांधवांनी अभंग , भक्तिगीते , गवळणी, श्लोक सादर करून संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध केले त्याच प्रमाणे महिला वर्गाने गोरोबाकाकांच्या सुरेल ओव्या गाऊन कार्यक्रमाची रंगत
वाढवली व सर्वांना आपण " तेर " गावीच असण्याची अनुभूती दिली या मध्ये विशेष करून सौ. योगिता जाधव, जागृती जाधव ( नाशिक ), सुवर्णा जाधव ( नाशिक ), ऋतुजा जाधव , प्रमिला तायडे , स्नेहलता रमेशजी गायकवाड,(नाशिक) महानंद घटकर , सुनीता राजमाने ( लातूर ) , शालन कुंभार ( बिड ), पांडुरंग सुपेकर (पुणे) , कु. गौरी व भक्ती साळवी ( दाभोळ ), राजेंद्र जी साळवी ( आळंदी ) , अनन्या गायकवाड ( नाशिक) इत्यादी गायकांनी गोरोबा काकांच्या चरणी आपल्या सुमधुर गायनाने आपली सेवा अर्पण केली. या भक्तिमय वातावरणात सर्वच समाज बांधव तल्लीन झाले होते. त्या मुळेच या करोनाच्या
महामारीत सुद्धा समाज बांधवांन मध्ये जणू एक सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी असे सुंदर वातावरण प्रत्येकाच्या मना मनामध्ये निर्माण झाले होते. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारे ऑनलाईन उपस्थित नाशिकचे कुंभार समाजाचे पत्रकार श्री सुभाष जाधव व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना असासुंदर सोहळा आयोजित केल्याबद्दल पुणे संघटनेचे मनापासून कौतुक केले.
समस्त पुणे समाज कार्यकारिणीने अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे सादरीकरण केले . समाजाचे संघटक श्री संतोष चिवेलकर ( साळवी) व सौ वैशालीताई मंडळ (अंबीरकर) यांनी सर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या पुर्ण होण्यासाठी संयोजन , आयोजन आणि सूत्रसंचालन अशी भूमिका यशस्वीपणे पार पाडली.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री गजानन दादा बागावडे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन समस्त बांधवांचा मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद आणि मिळालेली दाद या पासून प्रेरित होऊन "कुंभार" समाजातील समस्त महिला वर्ग व बाळ गोपाळान साठी "ऑनलाईन संमेलन" आयोजित करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे नमूद करून भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment