Breaking

Tuesday, 22 June 2021

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - पोलिस अधिकारी, गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख तानाजी दिगंबर सावंत यांच्या हस्ते योगयज्ञाचा शुभारंभ.


पोलिस अधिकारी, गुन्हा अन्वेषण विभाग प्रमुख मा. तानाजी दिगंबर सावंत साहेब यांच्या हस्ते "जागतिक योगयज्ञाचा शुभारंभ .
महाएनजीओ फेडरेशनचे महाराष्ट्र, आत्मसहाय्य सामाजिक संस्था व महाएनजीओ मध्ये समाविष्ट असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने सकाळी सात वाजता गंधर्व नगरी, संस्कृती बंगला, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर येथे तानाजी दिगंबर सावंत साहेब यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून योगयज्ञाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी महाएनजीओ फेडरेशनचे समन्वयक श्री अशोक शांताराम पोतनीस यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानाचा फेटा घालून प्रमुख कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी मा.तानाजी सावंत व मा. सुरेश जाधव 
यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचलन दिप्ती कदम यांनी केले .योगयज्ञाचे महत्व सांगताना सावंत साहेब यांनी बाह्य शरिरातील आरोग्याबरोबर अतंर्गत समाधान व मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर योगाद्वारेच साध्य होत आसते असे प्रतिपादन केले.सौ.आरती पोतनीस यांच्या  पसायदानाने  पहिल्या सत्राची सांगता करुन आठ वाजता दुसरे सत्र ऑन लाईन प्रोजेक्टच्या माध्यमातून योग यज्ञाचा प्रसार करून त्यामध्ये प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.
यावेळी सचिन गणबावले, प्रज्ञा यादव, निळकंठ देसाई, दादासाहेब लाड, राहूल देसाई, रितेश लाड, संदिप आंबेकर,जोती ढोबळे व जेष्ठ नागरिक शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सुरक्षित अंतर ठेऊन, सहभागी झाले. या कार्यक्रमास महाएनजीओ संस्थापक अध्यक्ष आदरणीय शेखर भाऊ, विजय वरुडकर, मुकुंद शिंदे, गणेश बाकले यांचे मार्गदर्शन लाभले.पाहूण्याच्या हस्ते सहभागी सदस्यांना प्रशस्तिपत्र देउन सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment