कराड -- कराड तालुक्यातील रेठरे येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक ची पूर्वप्रकिया सुरु झाली आहे .
सहकारी निवडणूक प्राधिकरण कडून शुक्रवारी कारखान्याचा निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक म्हणून प्रकाश आस्थेकर यांची नियुक्ती केली.
तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कराडचे उपनिबंधक मनोहर माळी यांच्यासह 3 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान 19 मे पासून कारखान्याचा निवडणूक रणसंग्राम सुरू होण्याची श्यक्यता असून मतदान 26 तर निकाल28 जून ला होण्याची श्यक्यता आहे.
कृष्णा कारखान्याचा निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम झाली असून 47 हजार 160 मतदार आहेत . मतदार यादी अंतिम झाल्याची तारखेपासून 10 दिवसानंतर व 20 दिवसाच्या आत कारखान्याचा निवडणुकीचा कार्यक्रम कायद्यानुसार जाहीर होणार आहे. त्यानुसार 15 ते 25 मे दरम्यान कधीही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे .
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कारखाण्याचा निवडणुकीचा कार्यक्रम तयार करून त्यास निवडणूक प्राधिकरणकडे पाठवण्यात आल्याचे समजले आहे मंजुरी नंतर कारखान्याचा निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.अद्याप कृष्णा च्या निवडणुकीचा रणसंग्राम अधिकृत जाहीर झालेला नाही.


No comments:
Post a Comment